दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक ; भिगवण पोलीसांची कामगिरी
-----------------------
भिगवण येथील पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पुण्यातील दरोडेखोरांच्या टोळीला भिगवण पोलीसांनी जेरबंद केले.
संदीप आनंद हरगुडे वय -३४ रा.हारनस ता.भोर जि.पुणे, रामदास उर्फ युवराज ज्ञानोबा शेलार वय - ३३ रा.कांबरे ता.भोर जि.पुणे, अनिकेत विलास सुकाळे वय -२३ रा.कांबरे ता.भोर जि.पुणे सध्या रायकरमळा ,धायरी जि.पुणे अशी जेरबंद करण्यात आलेल्या तिघांची नावे असून जेरबंद करण्यात आलेल्या तिघा आरोपींकडून एक गावठी पिस्तूल , ५ जिवंत काडतुसे, एक लोखंडी कटर,चाकू, दोरी,मिरची पावडर, दुचाकी असा १ लाख ५ हजार रूपयांचा ऐवज जप्त केला.
आरोपींचे इतर साथीदार शंभुराज मच्छिंद्र जेधे रा.आंबवडे ता.भोर व पुनित या आरोपींना पोलीस शोधत
दरोड्याच्या तयारीतील टोळीला अटक ; भिगवण पोलीसांची कामगिरी
-----------------------
भिगवण येथील पेट्रोलपंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या पुण्यातील दरोडेखोरांच्या टोळीला भिगवण पोलीसांनी जेरबंद केले.
संदीप आनंद हरगुडे वय -३४ रा.हारनस ता.भोर जि.पुणे, रामदास उर्फ युवराज ज्ञानोबा शेलार वय - ३३ रा.कांबरे ता.भोर जि.पुणे, अनिकेत विलास सुकाळे वय -२३ रा.कांबरे ता.भोर जि.पुणे सध्या रायकरमळा ,धायरी जि.पुणे अशी जेरबंद करण्यात आलेल्या तिघांची नावे असून जेरबंद करण्यात आलेल्या तिघा आरोपींकडून एक गावठी पिस्तूल , ५ जिवंत काडतुसे, एक लोखंडी कटर,चाकू, दोरी,मिरची पावडर, दुचाकी असा १ लाख ५ हजार रूपयांचा ऐवज जप्त केला.
आरोपींचे इतर साथीदार शंभुराज मच्छिंद्र जेधे रा.आंबवडे ता.भोर व पुनित या आरोपींना पोलीस शोधत आहेत.
सहाय्यक निरीक्षक दिलीप पवार यांना भिगवण येथील सोनाज पेट्रोलपंपावर दरोडेखोर दरोडा टाकण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाल्याने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पवार यांनी फौजदार विनायक पाटील, रूपेश कदम, इन्कलाब पठाण, अप्पा भांडवलकर, रामदास जाधव ,समीर करे, शंकर निंबाळकर, सुभाष कडदेस ,अंकुश माने, सचिन पवार यांचे पथक तयार करून सापळा रचून तिघा आरोपींना जेरबंद केले.
.

प्रतिनिधी :- विजय ढमढेरे कोंढापुरी ता.शिरूर