• Total Visitor ( 430373 )
News photo

कोंढापुरी येथे दत्तजयंती धार्मिक वातावरणात साजरी

Raju tapal December 05, 2025 52

कोंढापुरी येथे दत्तजयंती धार्मिक वातावरणात साजरी

 

शिरूर:- तालुक्यातील कोंढापुरी येथे दत्तजयंती धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. महाराष्ट्र क्राईम‌ न्यूज चे मुख्य संपादक एकनाथराव आडसूळ यांनी त्यांच्या कोंढापुरी येथील आडसूळ वस्ती निवासस्थानाशेजारी दत्तमंदिर बांधलेले असून याठिकाणी गुरूवार दि.४ डिसेंबरला श्री.दत्तात्रेय जयंती मोठ्या उत्साहात, धार्मिक वातावरणात साजरी करण्यात आली. दुपारी ३ ते ८ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.

कोंढापुरी येथील विविध संस्था,संघटना पदाधिका-यांसह ,ग्रामस्थ तसेच शालेय विद्यार्थी,विद्यार्थिनींनी महाप्रसादाचा लाभ घेतला. दत्तजयंतीचे औचित्य साधून "टिटवाळा न्यूज "चे पत्रकार श्री.विजयराव ढमढेरे यांनीही आडसूळवस्ती येथील दत्तमंदीरातील दत्तात्रेय मुर्तींचे मनोभावे दर्शन घेतले. अहिल्याबाईनगर येथेही महाराष्ट्र क्राईम न्यूज चे मुख्य संपादक एकनाथराव आडसूळ यांनी दत्तजयंतीचे औचित्य साधून महाप्रसादाचे आयोजन केले होते.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement