• Total Visitor ( 430061 )
News photo

उल्लेखनीय काम करणा-या व्यक्ती व संस्थांना दौंडकर स्मारक समितीच्या वतीने पुरस्कार जाहीर 

Raju tapal July 23, 2025 79

उल्लेखनीय काम करणा-या व्यक्ती व संस्थांना दौंडकर स्मारक समितीच्या वतीने पुरस्कार जाहीर 



विजय ढमढेरे 

शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणा-या व्यक्ती व संस्थांना बाबुराव दौंडकर स्मारक समितीच्या वतीने पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

गेली २८ वर्षं शिरूर तालुक्यातील कृषी व ग्रामविकासात काम करणारी बाबुराव दौंडकर स्मारक समिती एक अग्रगण्य संस्था असून तालुक्यात अनेक व्यक्ती व संस्था विविध क्षेत्रात निरपेक्ष भावनेने काम करून समाजाची सेवा करत आहेत. त्याची दखल घेवून व त्यांचे पासून प्रेरणा घेवून इतर घटकांनी देखील काम करावे या उद्देशाने संस्थेच्या वतीने यावर्षी शिरूर तालुक्यातील कृषी,पर्यावरण, जल व्यवस्थापन,सेवा,गोसेवा क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत अशी माहिती बाबुराव दौंडकर स्मारक समितीचे अध्यक्ष अॅड.धर्मेंद्र खांडरे‌ यांनी दिली.

स्व.कांचनभाई‌ शहा जलव्यवस्थापन पुरस्कार पाणीदार टीम कान्हूरमेसाई,स्व.बिंदूमाधव जोशी पर्यावरण पुरस्कार ग्रामविकास फाऊंडेशन कोंढापुरी,स्व.मधूकर टेमगिरे कृषी गौरव पुरस्कार (पुरूष) कांतिलाल नाना नलगे नागरगाव ता‌.शिरूर ,स्व.संतोष गांधी गोसेवा पुरस्कार सुरेंद्र देव दहीवडी ता‌.शिरूर,स्व.गणपत मुकींदा खेडकर सेवा कार्य पुरस्कार महावीर की रोटी शिरूर,स्व.बबुताई बाबुराव दौंडकर कृषी गौरव पुरस्कार (महिला) नुतन प्रवीण नळकांडे बुरूंजवाडी ता‌.शिरूर यांना जाहीर करण्यात आले आहेत असे अॅड.खांडरे‌ यांनी सांगितले.

पुरस्कार म्हणून रूपये ५००१/- व मानपत्र देऊन पुरस्कारार्थींना‌ गौरविण्यात येणार असून रविवार दि‌.३ आॅगस्ट २०२५ रोजी सकाळी साडेदहा वाजता समितीच्या श्री.क्षेत्र रांजणगाव गणपती येथील सभागृहात शिक्षण प्रसारक मंडळी पुणे नियामक मंडळाचे अध्यक्ष जेष्ठ विधिज्ञ अॅड.एस के जैन यांच्या हस्ते, भारतीय किसान संघाचे प्रांत संघटनमंत्री चंदन सर्जेराव पाटील यांच्या अध्यक्षतेखाली,आमदार माऊली आंबा कटके, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे संचालक प्रदीपदादा कंद यांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा होणार आहे असे बाबुराव दौंडकर स्मारक समितीचे अध्यक्ष अॅड.धर्मेंद्र खांडरे‌ यांनी सांगितले.

     


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement