• Total Visitor ( 429475 )
News photo

कोंढापुरी ते आळंदी पायी दिंडी वारी सोहळ्याचे आयोजन         

Raju tapal November 10, 2025 45

कोंढापुरी ते आळंदी पायी दिंडी वारी सोहळ्याचे आयोजन 

       

शिक्रापूर (प्रतिनिधी):- कोंढापुरी ते श्री क्षेत्र आळंदी पायी वारी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

शुक्रवार दि.१४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजता कोंढापुरी येथील विठ्ठल मंदिरातून पायी वारी दिंडी सोहळ्यास सुरूवात होणार असल्याचे कोंढापुरी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष,ह.भ.प.मधुकर जगन्नाथ गायकवाड यांनी सांगितले. सत्यवान भुजबळ,विठ्ठल महिपती जाधव,मुरलीधर केरबा गायकवाड,कैलास मोहिते, काका गरूड,प्रकाश खलाटे,चंद्रकांत खलाटे‌,संजय गायकवाड यांच्या वतीने दिंडीतील सहभागी वारक-यांची चहा,नाष्टा,जेवणाची व्यवस्था केलेली आहे. कोंढापुरी,कवठीमळा,कासारी फाटा,२४ वा मैल,मलठण फाटा, शिक्रापूर,चाकण चौक,मांढरे वस्ती चाकण रोड,जातेगाव खुर्द,करंदी,पिंपळे जगताप,चौफुला,बहुळ,शेल पिंपळगाव, वडगाव घेणंद अशी मजल करत कोंढापुरी नवनाथ दिंडी सोहळ्यातील वारकरी दि.१५ नोव्हेंबर ला ज्ञानसागरसमोरील ह.भ.प.चौधरी महाराज यांच्या धर्मशाळेत संध्याकाळी मुक्कामी पोहचणार आहे. वारीत सहभागी होणा-या वारक-यांनी अंथरून,पांघरून घेवून १४ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी ८ वाजता कोंढापुरी येथील विठ्ठल रूक्मिणी मंदीरात सकाळी ८ वाजता हजर राहावे असे आवाहन ह.भ.प.मधूकर जगन्नाथ गायकवाड यांनी केले आहे.

         


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement