• Total Visitor ( 626545 )
News photo

आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी दिनेश गुंड यांची निवड

Raju Tapal publisher May 20, 2026 55

आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी दिनेश गुंड यांची निवड



शिरूर:- जागतिक कुस्ती संघटनेच्या वतीने 22 ते 26 मे 2026 या कालावधीत व्हिएतनाम येथे होणाऱ्या 23 वर्षाखालील आशियाई कुस्ती स्पर्धेसाठी प्रा.दिनेश गुंड यांची भारतीय कुस्ती संघाच्या वतीने तांत्रिक अधिकारी म्हणून निवड केली आहे.आंतरराष्ट्रीय स्पर्धाची त्यांची गगनभरारी महाराष्ट्राच्या नवीन पिढीला आदर्श देणारी आहे.आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे प्रतिनिधित्व करण्याची त्यांची ही 69 वी आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे.आता पर्यंत राज्य,राष्ट्रीय स्तरावर 200 हून अधिक तर आंतरराष्ट्रीय स्तरावर 69 आंतरराष्ट्रीय स्पर्धेत देशाचे प्रतिनिधित्व करणारे ते महाराष्ट्रातील एकमेव तांत्रिक अधिकारी आहेत.त्यांच्या या यशाबद्दल केंद्रीय मंत्री मुरलीधरआण्णा मोहोळ,कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस,सरचिटणीस योगेश दोडके,कार्याध्यक्ष संदीपआप्पा भोंडवे,पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष मेघराज कटके,पै बाळासाहेब चौधरी यांनी अभिनंदन केले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement