• Total Visitor ( 712080 )
News photo

 टेंभी नाका नवरात्रोत्सवासाठी वाहतुकीत बदल

Raju Tapal publisher October 04, 2026 13

 



 टेंभी नाका नवरात्रोत्सवासाठी वाहतुकीत बदल



४ ते २० ऑक्टोबरदरम्यान पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन



ठाणे:-  ठाण्यातील प्रसिद्ध टेंभी नाका नवरात्रोत्सवाला ११ ऑक्टोबर पासून सुरुवात होत असून,उत्सवाच्या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी ठाणे शहर वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. हे निर्बंध रविवार ४ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत २४ तास लागू राहणार आहेत. वाहनचालकांनी संबंधित पर्यायी मार्गांचा वापर करावा,असे आवाहन करण्यात आले आहे.  टेंभी नाका नवरात्रौत्सवाला या परिसरात होणारी गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी काही मार्गांवर वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. नवरात्रोत्सवाच्या काळात टेंभी नाका परिसरात मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने वाहनचालकांनी वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करून पर्यायी मार्गांचा वापर करावा,असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस वाहने,अग्निशमन दलाची वाहने,रुग्णवाहिका आणि इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनांना या वाहतूक निर्बंधातून सूट देण्यात आली आहे. ही वाहतूक अधिसूचना ४ ऑक्टोबर ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत २४ तास लागू राहणार असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट यांनी दिली.



ठाणे स्टेशनकडून येणाऱ्या वाहनांसाठी बदल : ठाणे स्टेशन येथून टॉवर नाका तसेच दगडी शाळा चौकाच्या बाजूने वीर सावरकर रोडमार्गे टेंभी नाका आणि पुढे सिव्हिल हॉस्पिटलच्या दिशेने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना,तसेच टीएमटी व एसटी बसेसनाही टेंभी नाका सुजय हॉटेल कट येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.ही वाहने टेंभी नाका सुजय हॉटेल कट येथून उजवीकडे वळून ठाणे महापालिका शाळा क्रमांक १७ मार्गे कोर्टनाका सर्कल आणि पुढे इच्छितस्थळी जातील.



चरईकडून येणाऱ्या वाहनांसाठी पर्यायी मार्ग :



चरईकडून एदलजी रोडमार्गे भवानी चौक आणि टेंभी नाक्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना धोबी आळी क्रॉस, फेअर अपार्टमेंट येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे.

ही वाहने धोबी आळी क्रॉसपर्यंत सरळ जाऊन डावीकडे वळतील. त्यानंतर धोबी आळी चौक,धोबी आळी मशीद,सिव्हिल हॉस्पिटलमार्गे पुढे इच्छितस्थळी जातील.



सिव्हिल हॉस्पिटलच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना निर्बंध :



डॉ.बाबासाहेब आंबेडकर रोड तसेच मीनाताई ठाकरे चौकाकडून सिव्हिल हॉस्पिटल कॉर्नर मार्गे टेंभी नाक्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना सिव्हिल हॉस्पिटल येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. या वाहनांनी सिव्हिल हॉस्पिटल कॉर्नर येथून जीपीओ मार्गे कोर्टनाका सर्कल, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक मार्गे पुढे इच्छितस्थळी जातील.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement