हिंदूह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिन निमित्त प्रेरक वक्ते दिनेश गुप्ता यांनी साकारले अनोखा जागतिक विक्रम
आफ्रिकेचा विक्रम मोडत भारताचा लौकिक वाढवला
कल्याण.... मराठी अस्मितेचे प्रतीक,दयाळू,मदतगार आणि प्रखर नेतृत्वाची ओळख असलेले बाळासाहेब ठाकरे जे एक कुशल कार्टूनिस्ट आणि कलाकारही होते. त्यांच्या 13 व्या पुण्यतिथीनिमित्त कल्याण येथील प्रेरक वक्ते प्रो. डॉ. दिनेश गुप्ता ‘आनंदश्री’ यांनी एक अनोखा जागतिक विक्रम प्रस्थापित करून त्यांना विशेष श्रद्धांजली वाहिली. या प्रसंगी डॉ. दिनेश गुप्ता यांनी गळ्यामध्ये सर्वाधिक लॅनयार्ड (रिबनसह आयडी कार्ड) परिधान करण्याचा नवा जागतिक विक्रम केला. यापूर्वी हा विक्रम आफ्रिकेतील नायजेरिया देशातील विझडम ओकोजी यांच्या नावावर होता, ज्यांनी 600 लॅनयार्ड परिधान केले होते. डॉ. गुप्ता यांनी केवळ एका तासात 750 आयडी कार्ड गळ्यात घालून हा नवा विक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. या विक्रमाच्या वेळी साक्षीदार म्हणून अण्णासाहेब वाडवराव,प्रो. डॉ. एडवोकेट चंद्रशेखर गुप्ता, कपिल गुप्ता,आर्टिस्ट अजिंक्य वानखेडे तसेच आदित्य गुप्ता उपस्थित होते. या विक्रमाचे संपूर्ण व्हिडिओ,फोटो,दस्तऐवज आणि पुरावा सामग्री लंडन येथील गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स मुख्यालयात अधिकृत पडताळणीसाठी पाठवण्यात आले आहे. लवकरच सकारात्मक निकालासह हा नवा विक्रम भारताच्या नावावर अधिकृतपणे नोंदवला जाईल,अशी अपेक्षा आहे.