• Total Visitor ( 430541 )
News photo

रांजणगाव सांडस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप    

Raju tapal August 29, 2025 60

रांजणगाव सांडस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप    



शिक्रापूर (प्रतिनिधी) :- शिरूर तालुक्यातील रांजणगाव सांडस येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील एकूण १५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप करण्यात आले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी केलेल्या आवाहनाला रांजणगाव सांडस येथील ग्रामपंचायत पदाधिकारी व दानशूरांनी प्रतिसाद देवून १५ सायकली जमा केल्या व त्या सायकलींचे वाटप केले.

मंत्रालयातील कक्ष अधिकारी सचिन काळभोर,सरपंच रणदिवे,माजी सरपंच उत्तम लोखंडे,जिल्हा दूध उत्पादक संघाचे माजी संचालक जीवन तांबे, उपसरपंच प्रवीण रणदिवे,प्रवीण निंबाळकर,राजाराम सोपान रणदिवे,तंटामुक्ती अध्यक्षा मालू शिंदे,सुनील लक्ष्मण रणदिवे, दत्तात्रय राजाराम असावले,रोहिदास वसंत रणदिवे,माया शंकर रणदिवे,पंकज हरिदास रणदिवे,सर्जेराव भोसले,भिऊ बाबुराव रणपिसे,यांनी सायकल खरेदी करून मुख्याध्यापक हिरामण शेलार,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोरक्ष डुबे‌,देवराम अलभर यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप केले.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement