ब्राह्मणवाडा गोविंदपुर येथे जिल्हास्तरीय कब बुलबुल उत्सव साजरा
अमरावती जिल्हातील ४२पथकातील ३००विद्यार्थी सहभागी
अमरावती-शिक्षण विभाग अमरावती व अमरावती भारत स्काऊट गाईड जिल्हा कार्यालय अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 26 व 27 डिसेंबर 2025 या कालावधीत दुसऱ्या कब बुलबुल उत्सवाचे आयोजन जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ब्राह्मणवाडा गोविंदपुर ता. जि.अमरावती येथे करण्यात आले. कब बुलबुल उत्सवाचे उद्घाटन दिनांक 26 डिसेंबर 2025 रोजी माननीय सतीश मुगल,शिक्षणाधिकारी प्राथमिक तथा जिल्हा मुख्य आयुक्त यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी रवींद्र निंघोट मुख्याध्यापक उच्च प्राथमिक शाळा ब्राह्मणवाडा गोविंदपुर हे होते. या उद्घाटनाप्रसंगी मुख्य अतिथी निखिल मानकर उपशिक्षणाधिकारी माध्यमिक तथा जिल्हा सचिव,इम्रान खान,उपशिक्षणाधिकारी माध्यमिक,प्रवीण दिवे, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष,सुनिता इथापे जिल्हा प्रशिक्षण आयुक्त गाईड,माननीयसंजय रामावत जिल्हा प्रशिक्षण आयुक्त स्काऊट,गोकुळदास राऊत (अध्यक्ष )जि. प. अमरावती शिक्षक सहकारी बँक लिमिटेड अमरावती,स्नेहलताई भुयार,सरपंच राजेंद्र भोयर उपसरपंच तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रेम कुमार बागडे उपाध्यक्ष प्रशांत धोत्रे,रामजी बनसोड (सेवानिवृत्त) मुख्याध्यापक हरिश्चंद्रजी खैर गटशिक्षणाधिकारी (सेवानिवृत्त) अतिथी म्हणून उपस्थित होते.कब बुलबुल उत्सवाची सुरुवात लॉर्ड बेडन पावेल,लेडी बेडन पोवेल व सावित्रीबाई फुले यांची प्रतिमा पूजन करून व मान्यवरांचे स्वागत करून करण्यात आले.यानंतर कब बुलबुल यांनी पोत्याची शर्यत,लिंबू चमचा,बॉल गेम,हस्त कौशल्य,सांस्कृतिक कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमाचा आनंद घेतला बुलबुल उत्सवात दुसऱ्या दिवशी भव्य दिव्य अशा शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. शोभायात्रेमध्ये विविध शाळांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणारे कार्यक्रम सादर केले. बक्षीस वितरण समारंभ माननीय रविकांत जी वानखडे,सेवानिवृत्त (प्राचार्य,)जिल्हा संघटक गाईड प्रीती गोल्हार,एस.पी. आठवले,जिल्हा संघटक स्काऊट,डॉ.देवकी औगड,सहसचिव,दिनेश शर्मा,मुख्याध्यापक,रामविलास मुंदडा विद्यालय,उदखेड,विजय भनग मुख्याध्यापक छत्रपाल भुयार विद्यालय ब्राह्मणवाडा,रवींद्र निंघोट मुख्याध्यापक (मेळावा स्वागताध्यक्ष,)गावातील सन्माननीय सरपंच उपसरपंच यांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले.या कब बुलबुलउत्सवांमध्ये अमरावती जिल्ह्यातील 42 पथकातील 300 पेक्षा जास्त विद्यार्थी सहभागी झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालाजी सानप यांनी केले. प्रास्ताविक एस. पी आठवले जिल्हा संघटक स्काऊट यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रीती गोल्हार जिल्हा संघटक गाईड यांनी केले. या कब बुलबुल उत्सव यशस्वी करिता दादाराव भोंगळे,कार्यालयीन कर्मचारी उमेश नवरे, प्रीती नन्नावरे,नंदकिशोर रामावत,संतोष खारोडे,स्वप्निल रोडगे,प्रेमदास बागडे,मिलिंद रंगारी यांनी कार्य केले.बक्षीस वितरण व प्रमाणपत्र वाटप करून उत्सवाचे सांगतात करण्यात आली. या कब बुलबुल उत्सव यशस्वी ते करिता जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा ब्राह्मणवाडा गोविंदपुर व छत्रपती भुयार विद्यालय ब्राह्मणवाडा येथील सर्व सन्माननीय सभासदांचे मोठे सहकार्य लाभले.