• Total Visitor ( 475522 )
News photo

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सवाचे मोठ्या थाटामाटात आयोजन

Raju Tapal publisher April 10, 2026 24

टिटवाळ्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव 2026 चे मोठ्या थाटामाटात आयोजन 



राजू टपाल.



टिटवाळा:- बहुजन उत्थान सेवा समिती,भारतीय बौद्ध महासभा मांडा टिटवाळा शहर यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा जोतिबा फुले यांच्या 200 व्या व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती निमित्ताने भव्य पारंपरिक मिरवणूक मंगळवार दि.14 एप्रिल 2026 रोजी आयोजित केली असून यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. 

यात प्रामुख्याने शनिवार दि. 11 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 7 वाजता महात्मा जोतिबा फुले यांची जीवनगाथा यावर भारतीय बौद्ध महासभा महिला अध्यक्ष प्रमुख वक्ते शिलाताई तायडे या मार्गदर्शन करणार आहेत. रविवार दि.12 एप्रिल रोजी सायंकाळी 6 वाजता संवाद नाट्य अकॅडेमी निर्मित लघुनाट्य कथन अंधाराला भेदणार लेखक आणि दिग्दर्शक सचिन जाधव तर सोमवार दि.13 एप्रिल रोजी सांयकाळी 7 वाजता विविध सांस्कृतिक कार्यक्रम व वक्तृत्व स्पर्धा सिद्धार्थ बौद्ध विहार मांडा टिटवाळा पश्चिम येथे आयोजित करण्यात आले आहे. तसेच मंगळवार दि. 14 एप्रिल 2026 रोजी सायंकाळी 5.30 वाजता भव्य पारंपरिक मिरवणूक काढण्यात येणार असून मिरवणुकीची सुरुवात संविधान चौक,जानकी विद्यालय,वासुंद्री रोड, मांडा टिटवाळा पश्चिम येथून होऊन मांडा टिटवाळा पूर्व संपूर्ण शहर फिरून तिचा समारोप वाजपेयी चौक मांडा टिटवाळा पूर्व इथे होईल. तरी सदरील कार्यक्रमासाठी सर्व आंबेडकर प्रेमी नागरिकांनी उपस्थिती दर्शवावी असे आवाहन विजय भोईर अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मांडा टिटवाळा शहर,नगरसेवक बंदेश जाधव,किशोर जाधव अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी मांडा टिटवाळा शहर,सन्नी जाधव युवा अध्यक्ष रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मांडा टिटवाळा शहर तसेच सिद्धार्थ (बंटी) भोईर अध्यक्ष डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कमिटी 2026 यांनी केलेले आहे. 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement