• Total Visitor ( 515625 )
News photo

डॉ.कमलेश आर्या यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान

Raju Tapal publisher May 16, 2026 101

डॉ.कमलेश आर्या यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान



शिरूर:- आदर्श समाजसेवक डॉ.कमलेश आर्या यांना स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया ग्रुपचे सी ई ओ निलेश साबे यांच्या हस्ते राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ एमईएस ओ डो टोरियम,पुणे याठिकाणी प्रदान करण्यात आला.कमलेश आर्या यांनी १९९९ साली सेंट कृष्णा स्कुलची सुरुवात करून शिक्षण प्रसाराला सुरवात केली.आज त्यांची प्रेरणा घेऊन १०० हुन अधिक शाळांची निर्मिती शिरूर तालुक्यात झाली आहे.त्यातील आज काही कॉलेज झाले आहेत.दिल्ली येथे शिक्रापूरच्या आर्या यांच्या सेंट कृष्णा शाळेची दखल सर्वप्रथम घेण्यात आली.अशा प्रकारे शिक्षण क्षेत्रात शिरूर तालुक्यात क्रांती केली.स्वतः आता सेंट कृष्णा स्कूल शिक्रापूर,सेंट विंचीस स्कूल कोरेगावभिमा, जालोन माता पब्लिक स्कूल जालोन,सेंट कृष्णा पोलीस लाईन गया,डॉ.ए पी जे अब्दुल कलाम स्कूल गया अशा प्रकारे शिक्षण क्षेत्रात क्रांती निर्माण करत होती हे सर्व काम करत सोबतच त्यांनी शिक्षणाबरोबर समाजात पसरलेली क्रूरता,भ्रष्ट्राचार,अत्याचार,शोषण दूर करण्यासाठी प्रयत्न केले यात खूप यातना आणि सफलता मिळली.पोलीस सुधारणे साठी कमलेश आर्या यांनी महाराष्ट्र हिवाळी विधानसभा अधवेशन नागपूर समोर ४ डिसेम्बर २००० रोजी आत्मदहन केले.२०११ रोजी जंतर मंतर नवी दिल्ली येथे अण्णा हजारे यांच्या जन लोकपाल आंदोलनानंतर त्याच ठिकाणी सुधारित करण्यासाठी डॉ.आर्या व टीमने १२ दिवस आमरण उपोषण करून सरकारला इशारा दिला.पाच वर्ष एका महिलेला लग्नानन्तर मूल झाले नाही म्हणून घरातून बाहेर काढले,२ वर्षांनंतर ती कंपनीत काम करते ही    माहीती कळाल्यावर तिला घरी आणून तिची हत्या केली आणि मग डॉ.आर्या यांनी हे प्रकरण उघडकीस आणून तत्कालीन मंत्री अजितदादा पवार आणि आर आर पाटील यांच्या माध्यमातून हत्या करणारांना शिक्षा देण्यचे काम आर्या यांनी केलं.तसेच समाजामध्ये अनधिकृत जागेवरती कब्जा करणाऱ्या लोकांच्या ताब्यातून समाजातील लोकांना त्यांच्या जमिनी घरे,हक्काची मालमत्ता परत मिळवून देण्यासाठी ते तन मन धन व शिक्षणाच्या बुद्धीच्या जोरावर ते काम करत आहेत याची दखल घेत हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला.डॉ. आर्या यांना राज्यस्तरीय आदर्श शिक्षक व समाजसेवक पुरस्कार,एम आय टी सी ई ओ विश्वनाथ कराड यांच्या हस्ते प्रदान,भारतीय रत्न सम्मान पुरस्कार,डॉ.ए पी जी अब्दुल कलाम लखनो,समाजरत्न नई दिल्ली तत्कालीन केंद्रीय मंत्री हरीशजी रावत यांच्या हस्ते पुरस्कार, राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार २०२६ शिफ्ट अँड लिफ्ट मीडिया कडून सन्मानित देशभरातील उत्कृष्ट शिक्षकांचा गौरव करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या सोहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवर,शिक्षकवर्ग तसेच उपस्थित प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमामध्ये शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून नवनाथ येवले,बाबासाहेब दिघे तसेच जयश्री तायडे उपस्थित होते.उपस्थित मान्यवरांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करत शिक्षण क्षेत्रातील योगदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement