खडीने भरलेल्या डंपरची दुचाकीला धडक; दुचाकीस्वाराचा मृत्यू
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- खडीने भरलेल्या डंपरने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना दौंड तालुक्यातील पडवी येथे घडली.
गबाजी भिमाजी कोळपे वय -५५ वर्षे रा.वाई सोमजाईनगर, सातारा असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. त्यांच्यासोबत असलेल्या अलका गबाजी कोळपे अपघातात जखमी झाल्या.
या अपघाताबाबत समजलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान कुसेगाव दिशेने खडी भरून येणा-या डंपरने सुपे बाजूकडून येणा-या दुचाकीस्वाराला पडवी फाटा येथे उडविल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पाटस पोलीसांनी घटनास्थळी भेट दिली. डंपर दुचाकीस्वाराच्या अंगावरून गेल्याचे समजते.