• Total Visitor ( 701992 )
News photo

चिंचोली मोराची येथे दत्त जयंती उत्साहात साजरी

Raju tapal December 05, 2025 154

चिंचोली मोराची येथे दत्त जयंती उत्साहात साजरी

          

शिरूर :- चिंचोली मोराची येथील उकिर्डे मळ्यात 4 डिसेंबर रोजी दत्त मंदिरात दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दत्त मंदिरात सकाळी दत्तमूर्ती अभिषेक करण्यात आला. संध्याकाळी ०५ वाजता महिला भजनी मंडळाच्या वतीने छान सुंदर भजन करण्यात आले. त्यानंतर संध्याकाळी ०६ वाजुन ३० मिनिटांनी दत्त मंदिरात महिलांनी पाळणा म्हणत भक्तिमय वातावरनात फुलाची उधळण केली. तसेच उपस्थित भक्तजनांना महाप्रसादाचे वाटप करून दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपस्थिती मानसिंग भैय्या पाचुंदकर पाटील,कारेगावच्या आदर्श सरपंच निर्मलाताई शुभम नवले,दत्ता भाऊ नाणेकर,कुमार महाराज नाणेकर,गणेश दादा धुमाळ,विजय आबा उकिर्डे,काळुराम उकिर्डे,मच्छिंद्र उकिर्डे,संभाजी चव्हाण,ज्ञानेश्वर उकिर्डे,गोरख उकिर्डे,जयसिंग उकिर्डे,महादेव धुमाळ,देवेंद्र उकिर्डे,गणेश भोसले,महेश उकिर्डे,सागर उकिर्डे,संभाजी चव्हाण,अक्षय उकिर्डे आदि मान्यवर आणि ग्रामस्थ उपस्थित होते. दत्त मंदिरचे दादासाहेब उकिरडे त्यांच्या पत्नी अक्षताताई संतोष उकिर्डे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026