• Total Visitor ( 435868 )
News photo

हर घर तिरंगा २०२५ उपक्रम अंमलबजावणी करण्याचे शिक्षणाधिकारी यांचे आदेश

Raju tapal August 07, 2025 79

हर घर तिरंगा २०२५ उपक्रम अंमलबजावणी करण्याचे शिक्षणाधिकारी यांचे आदेश.



अमरावती :- अमरावती जिल्हा परीषद अंतर्गत सर्व माध्यमाच्या, सर्व व्यवस्थापनाच्या मुख्याध्यापक,शिक्षक बंधू भगिनींना प्राथमिक शिक्षणाधिकारी सतिश मुगल यांच्या आदेशा नुसार १५ ऑगस्ट २०२५ या स्वातंत्र्य दिनानिमित्त हर घर तिरंगा २०२५ या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करायची आहे.

हर घर तिरंगा २०२५ या उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी ही आपल्याला तीन टप्यात करायची आहे,ते तीन टप्पे पुढीलप्रमाणे.



(१) टप्पा क्रमांक १ हा २ ऑगस्ट २०२५ ते ८ ऑगस्ट २०२५ या कालावधीत राबवायचा आहे, या टप्प्यामध्ये पुढील उपक्रम राबवायचे आहेत.



(A)शाळा, कार्यालये,सार्वजनिक ठिकाणी तिरंगा प्रेरित सजावट.

(B)हर घर तिरंगा २०२५ या हॅशटॅग सह सोशल मीडियावर फोटो शेअर करणे.

(C) तिरंगा रांगोळी स्पर्धा कार्यशाळा.

(D) तिरंगा राखी बनविण्याच्या स्पर्धा- अंगणवाडी शाळा वृद्धाश्रम मॉल यामध्ये तिरंगा विषयक प्रश्नमंजुषा- My Gav व शाळांमध्ये जवानांसाठी पत्रलेखन उपक्रम.

(E) हर घर तिरंगा हर घर अभियान (८ऑगस्ट ते  १५ ऑगस्ट ) स्वच्छता व पाणी संजीवनीवर विशेष भर.

(F) स्वयंसेवक कार्यक्रम प्रचारकांनी घरोघरी तिरंगा पोहोचविणे व जनजागृती करणे.



(२) टप्पा क्रमांक २ हा ९ ऑगस्ट २०२५ ते १२ऑगस्ट २०२५ या कालावधीत राबवायचा आहे, या टप्प्यामध्ये पुढील उपक्रम राबवायचे आहेत.



(A) राज्यस्तरीय तिरंगा महोत्सव मान्यवरांच्या उपस्थितीत.

(B) तिरंगा मेला व देशभक्तीपर गीतांचा कार्यक्रम.

(C) तिरंगा बाईक व सायकल रॅली तिरंगा यात्रा व मानवी साखळ्या.

(D) तिरंगा विक्री - स्थानिक उत्पादक व स्वयं सहायता गटाचा समावेश.

(E) मीडिया व सोशल मीडिया प्रचार हॅशटॅगसह प्रसिद्धी.

(F) प्रत्येक घरात तिरंगा विकत घेण्याचे आवाहन.



(३) टप्पा क्रमांक ३ हा १३ ऑगस्ट २०२५ ते १५ऑगस्ट २०२५ या कालावधीत राबवायचा आहे, या टप्प्यामध्ये पुढील उपक्रम राबवायचे आहेत.



(A) घर कार्यालय वाहनावर तिरंगा फडकावणे.

(B) सेल्फी व फोटो अपलोड-www.harghartiranga. com वर.

(C) ध्वजारोहण समारंभ शहरी व ग्रामीण स्तरावर.

(D) कार्यक्रमाचे प्रसारण प्रसिद्धी.





वरील तीन टप्प्यानुसार कार्यक्रम व उपक्रमाची अंमलबजावणी सर्व शाळांमध्ये करण्यात यावी.



असे आदेश जिल्हातील सर्व गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले आहे.

========================


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement