• Total Visitor ( 700537 )
News photo

शिक्रापूर येथून वयोवृध्द बेपत्ता 

Raju tapal December 25, 2025 85

शिक्रापूर येथून वयोवृध्द बेपत्ता 

       

शिक्रापूर:-  शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथील त्रिमूर्ती मंगल कार्यालयात लग्नाला आलेले ७० वर्षीय वयोवृद्ध बेपत्ता झाले आहेत.

अशोकराव भालचंद्र बोरूडे असे बेपत्ता झालेल्या वयोवृद्ध व्यक्तीचे नाव असून ते अहिल्या नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील बाभूळवाडे येथील रहिवासी असून त्यांचा मुलगा अजित अशोकराव बोरूडे रा‌.बाबुरावनगर , शिरूर जि‌.पुणे यांनी याबाबत शिक्रापूर येथील पोलिस स्टेशनमध्ये खबर दिली. बेपत्ता झालेले अशोकराव बोरूडे यांचे वर्णन पुढीलप्रमाणे:- वय -७० वर्षे,उंची ५ फूट,रंग - निमगोरा,चेहरा उभट,डोक्याचे केस पांढरे,मिशी बारीक असून अंगात निळ्या रंगाचा हाप शर्ट,काळ्या रंगाची पॅन्ट घातलेली आहे. या वर्णनाची व्यक्ती आढळून आल्यास ९१४६ ८१२६८१ या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन शिक्रापूर पोलीसांनी केले आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026