• Total Visitor ( 645788 )
News photo

बिबट्याच्या हल्ल्यात इनामगावातील वृद्ध महिलेचा मृत्यू 

Raju tapal April 26, 2025 154

बिबट्याच्या हल्ल्यात इनामगावातील वृद्ध महिलेचा मृत्यू 



शिरूर :- बिबट्याने केलेल्या हल्ल्यात शिरूर तालुक्यातील इनामगाव येथील ९० वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी पहाटे घडली.

लक्ष्मीबाई बबन भोईटे असे बिबट्याने केलेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या वृद्ध महिलेचे नाव असून या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मीबाई भोईटे या घराच्या ओट्यावर झोपल्या होत्या.बिबट्याने पहाटे त्यांच्यावर हल्ला केल्यानंतर त्यांनी आरडाओरड केला. त्यांच्या मुलाने खिडकीतून डोकावून पाहिले असता बिबट्या लक्ष्मीबाई यांना ऊसाच्या शेतात घेवून गेल्याचे दिसले.स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने शोध घेतला असता शेतात त्या मृतावस्थेत आढळून आल्या.



प्रतिनिधी:- विजय ढमढेरे (कोंढापुरी ता‌.शिरूर)

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement