• Total Visitor ( 551399 )
News photo

सावरकरांच्या जयंतीदिनी पर्यावरण योद्धा डॉ.प्रशांत सिनकर यांचा गौरव 

Raju Tapal publisher May 30, 2026 25

सावरकरांच्या जयंतीदिनी पर्यावरण योद्धा डॉ.प्रशांत सिनकर यांचा गौरव 



ठाणे:- स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे ज्येष्ठ पत्रकार व पर्यावरण अभ्यासक डॉ. प्रशांत सिनकर यांचा सन्मानपूर्वक गौरव करण्यात आला. स्वातंत्र्यवीर वि.दा.सावरकर प्रतिष्ठान,ठाणे यांच्या वतीने मराठी ग्रंथ संग्रहालय येथे आयोजित कार्यक्रमात डॉ. प्रशांत सिनकर यांना शाल,श्रीफळ आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मृतिचिन्ह प्रदान करून त्यांच्या पर्यावरण संवर्धन,जलसंवर्धन आणि जनजागृती क्षेत्रातील योगदानाचा गौरव करण्यात आला. गेली २७ वर्षे पत्रकारितेच्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणासाठी कार्यरत असणारे डॉ. सिनकर यांनी जलस्रोत संवर्धन, जैवविविधता संरक्षण,वृक्षसंवर्धन आणि पर्यावरणपूरक जीवनशैलीबाबत समाजात व्यापक जनजागृती केली आहे. त्यांच्या लेखणीने केवळ प्रश्न मांडले नाहीत,तर पर्यावरण संवर्धनासाठी लोकचळवळ उभी करण्याचे कामही केले आहे. त्यांच्या या कार्याची दखल घेत सावरकर प्रतिष्ठानने त्यांचा विशेष सन्मान केला. यावेळी अर्थतज्ज्ञ आणि ज्येष्ठ विचारवंत चंद्रशेखर टिळक,शशिकांत विचारे,प्रशांत पाटील,प्रतिष्ठानचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. सिनकर यांच्या कार्याचा गौरव करत पर्यावरण क्षेत्रातील त्यांचे योगदान समाजासाठी प्रेरणादायी असल्याचे नमूद केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या राष्ट्रनिष्ठा,सामाजिक बांधिलकी आणि परिवर्तनवादी विचारांना अभिवादन करणाऱ्या या कार्यक्रमात डॉ. प्रशांत सिनकर यांच्या सन्मानामुळे पर्यावरण संवर्धनाच्या कार्यालाही विशेष अधोरेखित करण्यात आले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement