• Total Visitor ( 698317 )
News photo

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना पथकरातून सूट

Raju Tapal publisher September 10, 2026 22

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या वाहनांना पथकरातून सूट

ठाणे ग्रामीण पोलिसांकडून ‘गणेशोत्सव-२०२६ कोकण दर्शन’ स्टिकर्सच्या माध्यमातून वाहनांना टोलमाफी



राजू टपाल.



टिटवाळा:- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना दिलासा देण्यासाठी पथकरातून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे ग्रामीण पोलिसांकडून ‘गणेशोत्सव-२०२६ कोकण दर्शन’ या आशयाचे स्टिकर्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शासनाच्या निर्देशानुसार ११ सप्टेंबर २०२६ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत मुंबई-वडोदरा राष्ट्रीय महामार्ग,मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारितील काही पथकर नाक्यांवरून कोकणात जाणाऱ्या गणेशोत्सव भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट देण्यात येणार आहे. या पथकरमाफीचा लाभ घेण्यासाठी वाहनधारकांनी ‘गणेशोत्सव-२०२६ कोकण दर्शन’ या आशयाचे स्टिकर वाहनावर लावणे आवश्यक आहे. स्टिकरवर वाहन क्रमांक व चालकाचे नाव नमूद करण्यात येणार असून,संबंधित वाहनाला पथकरमाफीचा लाभ मिळणार आहे.

पथकरमाफीसाठी आवश्यक कागदपत्रे

वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स)

वाहनाचे कागदपत्रे — आर.सी. बुक,पी.यू.सी.,इन्शुरन्स कॉपी

सध्याचा राहता पत्ता दर्शविणारे कागदपत्र — आधार कार्ड,लाईट बिल,रेशन कार्ड आदी

ठाणे ग्रामीण पोलिसांच्या जिल्हा वाहतूक शाखेकडून हे स्टिकर्स उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. तसेच पथकरमाफीचा पास असलेल्या प्रवाशांनाही संबंधित नियमांनुसार सूट मिळणार आहे.

स्टिकर व पथकरमाफीसंदर्भात अधिक माहितीसाठी ठाणे ग्रामीण जिल्हा वाहतूक शाखेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. वाहतुकीचे नियम पाळा – सुरक्षित रहा – इतरांनाही सुरक्षित ठेवा!


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026