• Total Visitor ( 391595 )
News photo

पाटील बालमंदिर शाळेत विविध प्रकल्पांचे प्रदर्शन

Raju tapal February 09, 2026 83

पाटील बालमंदिर शाळेत विविध प्रकल्पांचे प्रदर्शन





कल्याण :- त्रिदल एज्युकेशन सोसायटी पाटील बालमंदिर शाळा मोहने येथे विविध प्रकल्पांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन पदवीधर आमदार निरंजन डावखरे व महापौर हर्षाली थविल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक राहुल कोट,गणेश कोट,तेजश्री गायकवाड,माजी नगरसेवक दशरथ तरे,जे.सी.कटारिया,सुरेश सोनार,रामा कांबळे,रमण तरे,वैभव पाटील,विजय चौधरी,हेमंत गायकवाड, तसेच शाळेचे विद्यार्थी शिक्षक पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन प्रसंगी महापौर हर्षाली थविल यांनी सांगितले की मी हि हयाच शिक्षण संस्थेच्या पाटील बालमंदिर शाळेत शिक्षण घेतले आहे. शिक्षणाचे मंदिर आहे, विद्यार्थांनी अभ्यास करातांना मोबाईल पासून दूर राहावे तसेच पालकांनी हि मोबाईल देवू नये,आमच्या वेळेस मोबाईल नसतानाही आम्ही शिक्षण घेतले आहे असे सांगितले. विविध प्रकारचे प्रकल्प बनविण्यात आले आहेत. तसेच यावेळी त्रिदल एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष एस.जे. पाटील,प्राचार्य बी. एन.पाटील,सचिव जी.एल. पाटील यांच्यासह शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी,पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement