• Total Visitor ( 588093 )
News photo

करडे घाटात गोळीबार.. एकाचा मृत्यू,एकजण गंभीर जखमी

Raju Tapal publisher June 02, 2026 45

करडे घाटात गोळीबार.. एकाचा मृत्यू,एकजण गंभीर जखमी



पुणे:- शिरूर तालुक्यातील करडे घाटात झालेल्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला असून एकजण गंभीर झाल्याची घटना घडली. विशाल सुनील काळे वय -३१ रा‌.ढोर आळी,मुंबई बाजार शिरूर असे गोळीबारात मृत्यू झालेल्याचे नाव असून केदार चंद्रकांत झाडगे‌ वय -२५ कुंभार आळी शिरूर,उमेश अनिल जगदाळे वय -२६ रा‌.ढोर आळी मुंबई बाजार शिरूर अशी गोळीबारात जखमी झालेल्यांची नावे आहेत. समजलेल्या माहितीनूसार,विशाल काळे हा त्याचा मित्र केदार झाडगे‌ याच्यासह उमेश जगदाळे याच्या एम एच १२एक्स क्यू  ५७०४ क्रमांकाच्या  मोटारीतून करडे‌ येथे कामानिमित्त गेले होते. तेथून परतताना करडे घाटानजिक सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास समोरून आलेल्या एम एच १४ एल ए ११२८ क्रमांकाच्या मोटारीने त्यांच्या मोटारीला धडक दिली. मोटारीतून उतरलेल्यांनी‌ विशाल काळे यांच्या मोटारीवर गोळीबार सुरू केला. जीव वाचविण्यासाठी तो मित्रा़सह मोटारीतून खाली उतरून जवळच्या ढाब्याकडे‌ पळत जात असताना पन्टी‌ व इतर हल्लेखोरांनी त्यांच्या दिशेने गोळीबार केला. उमेश जगदाळे ढाब्याच्या‌ आडोशाला लपून बसला. विशाल काळे याला गोळ्या लागल्याने तो खाली पडला.त्यावेळी सनी यादव व आणखी एकजण दुचाकीवरून तेथे आले.त्यांनी काळे यांच्या डोक्यात दगड घालून पळून गेले. यावेळी पाऊस चालू होता‌. गोळीबाराची माहिती कळताच शिरूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले,पोलीस निरीक्षक संदेश केंजळे,उपनिरीक्षक दिलीप पवार,शुभम चव्हाण,गोविंद खटिंग यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट दिली.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement