जि.प. माध्यमिक शाळा. उत्तमसरा येथील NMMS परीक्षेमध्ये पाच विद्यार्थी उत्तीर्ण
भातकुली/अमरावती- जिल्हा परिषद माध्यमिक शाळा,उत्तमसरा येथील विद्यार्थ्यांनी National Means-cum-Merit Scholarship Scheme (NMMS) परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या परीक्षेत शाळेतील पाच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेत भर पडली आहे. वर्ग आठवीचे विद्यार्थी लावण्या विलास दहीकर,सान्वी सतीश मानेकर,शुभेच्छा दीपक मावंदे,सम्यक रवींद्र गवई,नैतिक बंडू थोटे हे उत्तीर्ण झाले आहे. हे यश शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन,विद्यार्थ्यांची मेहनत व पालकांचे सहकार्य यांचे फलित आहे. या यशामुळे विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक लोमेश खैरकर,ज्येष्ठ शिक्षक संतोष कुर्हेकर,चंद्रशेखर ब्राह्मणकर,शितल भोपाळे,अश्विनी एस. झाडे,उमेश रामदास बसरे,प्रतिभा नांदणे, ज्योत्स्ना हायगले,भूषण एस बुरंगे,रेणुका केचे,मीनाक्षी इंगळे,राजेश सावरकर,गजानन येलोने आणि प्रमोद कांबळे यांनी शुभेच्छा दिल्या व पालकांनी त्यांचे अभिनंदन केले असून त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.