• Total Visitor ( 430439 )
News photo

कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते झेंडावंदन 

Raju tapal January 26, 2026 51

कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या हस्ते झेंडावंदन 



आज ७७ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त कल्याण डोंबिवली महानगरपालिका मुख्यालयात सकाळी ०७.३० वाजता आयुक्त अभिनव गोयल यांनी राष्ट्रध्वज फडकावून  ध्वजवंदन केले. यावेळी शहर अभियंता अनिता परदेशी,महापालिका उपायुक्त,सचिव,इतर अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.यासमयी अग्निशमन दल, सुरक्षा दल,स्थानिक पोलीस दल व msf चे जवान यांनी संचलन करून राष्ट्रध्वजाला सलामी दिली.यावेळी घनकचरा व्यवस्थापन विभागाच्या १२ गुणवंत सफाई कर्मचा-यांचा महापालिका आयुक्त व उपस्थित अधिकारी यांचे हस्ते प्रशस्तीपत्र आणि भेट वस्तु प्रदान करून सत्कार करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त महापालिकेच्या जुन्या डोंबिवली (पूर्व) विभागीय कार्यालयात अतिरीक्त आयुक्त योगेश गोडसे यांनी ध्वजवंदन  केले.याप्रसंगी पालिका सदस्य मंदार हळबे,महापालिकेचे इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तद्नंतर आयुक्त अभिनव गोयल यांनी कॅप्टन विनयकुमार सचान यांच्या स्मारकास पुष्पचक्र वाहून अभिवादन केले. यावेळी कॅप्टन विनयकुमार सचान यांचे बंधू,पालिका सदस्य मंदार हळबे,आसावरी नवरे,खुशबू चौधरी,महापालिका अधिकारी/ कर्मचारी वर्ग आणि नागरिक उपस्थित होते. यावेळी आयुक्त अभिनव गोयल यांनी डोंबिवलीतील प्रेरणा वॉर मेमोरियल येथेही पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. तदनंतर महापालिका आयुक्‍त  अभिनव गोयल यांनी डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर चौक येथील दीडशे फुटी उंच ध्वज फडकावून ध्वजवंदन केले. भारतीय संविधानाच्या तत्त्वांचा अंगीकार आपल्या दैनंदिन जीवनात करावा आणि सुजाण नागरिक म्हणून आपण समाजासाठी कसे योगदान देऊ शकतो याचा विचार करावा असे आवाहन करीत त्यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी वर्ग आणि नागरिक यांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.आमदार राजेश मोरे यांनीही यावेळी उपस्थितांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या. यासमयी आमदार राजेश मोरे,मा. पालिका सदस्य,महापालिका अधिकारी,वरिष्ठ पोलीस अधिकारी,नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement