• Total Visitor ( 430192 )
News photo

वनविभागाने बिबट्याला नैसर्गिक अधिवासात केले मुक्त  

Raju tapal July 04, 2025 65

लांजातील गवाणे येथे फासकीत अडकला बिबट्या 



वनविभागाने बिबट्याला नैसर्गिक अधिवासात केले मुक्त  



रत्नागिरी :- लांजा तालुक्यातील गवाणे येथे बिबट्या फासकीत अडकल्याची घटना आज गुरूवारी सकाळी उघडकीस आली. याची माहिती मिळताच वरीष्ठांच्या मार्गदर्शनाखाली वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत बिबट्याला फासकीतून सोडवत नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.



 गणू बाबू करंबळे राहणार गवाणे यांचे मा. ग. नं. 900 काजू बागेमध्ये वन्य प्राणी बिबट फासकीमध्ये  अडकले बाबत सुरेश तानाजी करंबळे राहणार गवाने यांनी भ्रमणध्वनी द्वारे कळवलेनुसार तात्काळ वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी जागेवर जाऊन पाहणी केली. सदर बिबट वन्य प्राण्याला लोखंडी पिंजऱ्यामध्ये सुरक्षित रित्या घेतले व त्याची पशुवैद्यकीय अधिकारी लांजा यांचेकडून तपासणी करून घेतली तो नर असुन अंदाजे दोन वर्ष वयाचा आहे तो सुस्थितीत असल्याची खात्री करून त्यास नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.



सदरची कार्यवाही ही मा. गिरजा देसाई विभागीय वन अधिकारी (प्रा.) रत्नागिरी (चिपळूण) मा. प्रियंका लगड सहाय्यक वनसंरक्षक (प्रा.) रत्नागिरी (चिपळूण) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकाश सुतार वनपरिक्षेत्र अधिकारी रत्नागिरी, राजेंद्र पाटील वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण राजापूर, न्हानू गावडे वनपाल पाली, महादेव पाटील वनपाल सामाजिक वनीकरण लांजा,विक्रम कुंभार वनरक्षक राजापूर, बाबासाहेब ढेकळे वनरक्षक सामाजिक वनीकरण लांजा, श्रावणी पवार वनरक्षक कोरले. नमिता कांबळे वनरक्षक लांजा,सिद्धार्थ हिमगिरे वनरक्षक, सामाजिक वनीकरण लांजा, चंद्रकांत रामाने वन मजूर व रेस्क्यू टीमचे दीपक कदम प्राणी मित्र,मंगेश महेश लांजेकर, मयुरेश आंबेकर,मंगेश आंबेकर व गवाणे गावचे इतर  ग्रामस्थ यांनी पार पडली. अशा प्रकारच्या घटना घडल्यास वनविभागाचा टोल फ्री क्रमांक १९२६ किंवा ९४२१७४१३३५ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन वनविभागाच्या वतीने मा गिरीजा देसाई  विभागीय वनअधिकारी रत्नागिरी यांनी केले.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement