• Total Visitor ( 704440 )
News photo

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन 

Raju tapal August 04, 2025 114

झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे निधन 



नवी दिल्ली :- झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं आज सोमवारी सकाळी निधन झालं आहे. ते दीर्घकाळापासून आजारी होते. दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयात त्यांनी शेवटचा श्वास घेतला. ते 81 वर्षांचे होते.



गुरुजी आपल्या सर्वांना सोडून निघून गेले अशा शब्दात झारखंडचे मुख्यमंत्री आणि त्यांचा मुलगा हेमंत सोरेन यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या. माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचं आज सकाळी 8.48 वाजता निधन झालं. गंगाराम रुग्णालयात नेफ्रोद डिपार्टमेंटमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. त्यांना किडनीशी संबंधित समस्या होती. त्याशिवाय प्रकृतीच्या आणखी सुद्धा समस्या होत्या. गेले काही दिवस त्यांची प्रकृती नाजूक होती आणि ते व्हेंटिलेटरवर होते. शिबू सोरेन यांचे पुत्र आणि झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.



शिबू सोरेन यांच्या निधनाने झारखंडच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. शिबू सोरेन झारखंड मुक्ती मोर्चाचे संस्थापक सदस्य होते आणि त्यांनी आदिवासींच्या हक्कांसाठी संघर्ष केला. शिबू सोरेन यांना झारखंडमध्ये 'गुरुजी' म्हणून ओळखले जाते. शिबू सोरेन यांनी स्वतंत्र झारखंड राज्याच्या मागणीसाठी आंदोलन केले. ते तीन वेळा राज्याचे मुख्यमंत्री झाले. शिबू सोरेन यांच्या नेतृत्वाखाली झारखंड मुक्ती मोर्चाने आदिवासी भागांमध्ये सामाजिक आणि राजकीय जागृतीचे अभियान चालवले. राज्याला वेगळी ओळख मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026