• Total Visitor ( 429406 )
News photo

भावी पिढी व्यसनांपासून दूर राहिली पाहिजे- प्रफुल्लचंद्र कुमावत 

Raju tapal November 22, 2025 64

भावी पिढी व्यसनांपासून दूर राहिली पाहिजे- प्रफुल्लचंद्र कुमावत 

        

शिरूर:- महाराष्ट्र राज्य कुमावत विकास सेवा संस्थेचे राज्य अध्यक्ष प्रफुल्लचंद्र कुमावत यांनी समाजाच्या समस्या जाणून घेण्यासाठी नुकताच पुणे जिल्हा दौरा केला. शिरूर तालुक्यातील शिक्रापूर गावाला त्यांनी भेट दिली.यावेळी शिक्रापूर नगरीचे विद्यमान सरपंच रमेश गडदे यांच्या हस्ते त्यांचा वह्या देऊन सन्मान करण्यात आला. साहित्यिक मनोहर परदेशी,मांडवगण-फराटा ग्रामपंचायतच्या माजी सदस्या हर्षदा परदेशी,मनिषा कुमावत,महेश शिर्के,जितेंद्र काळोखे,दिनेश अमाप,बजरंग मुंडे,रियाज शेख,सुनील सोनटक्के,आकाश अवसरमल आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. प्रफुल्लचंद्र कुमावत यांनी यावेळी बोलताना सांगितले की,समाजातील विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले पाहिजे तसेच भावी पिढी व्यसनापासून दूर राहिली पाहीजे. तसेच पुढील काळात महाराष्ट्रात गावोगावी संघटना बांधण्याचे व समाज मेळावा भरविण्याचा विचार व्यक्त केला. शिक्रापूर नगरीचे विद्यमान सरपंच रमेशराव गडदे यांनी मुले हीच देशाची संपत्ती आहे व भावी पिढी सुदृढ करण्यासाठी तरुण पिढी महत्वाची असल्याचे मत यावेळी व्यक्त केले. समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना कवी मनोहर परदेशी यांच्या वतीने वह्या व पेन देण्यात आले.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement