गलांडवाडी येथील शेतक-याच्या शेतात नारळ, टाचण्या टोचलेले लिंबू
Raju Tapal
January 28, 2022
47
गलांडवाडी येथील शेतक-याच्या शेतात नारळ, टाचण्या टोचलेले लिंबू ; इंदापूर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरूद्ध शेतक-याची फिर्याद
गलांडवाडी नंबर - २ हद्दीतील शिंदे वस्तीवरील शेतक-याच्या शेतात नारळ , टाचण्या टोचलेले लिंबू , गांधीटोपी, बागायतदार नैवेद्य, अंडी, हळदी कुंकू, अगरबत्ती असे अघोरी कृत्य केलेले साहित्य आढळून आल्याने हनुमंत माणिक शिंदे वय - ५८ रा.शिंदेवस्ती गलांडवाडी नंबर -२ ता.इंदापूर यांनी इंदापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी शेतात पाणी देण्यासाठी गेले होते. त्यांच्या मालकीच्या शेतात अघोरी कृत्य केलेले साहित्य आढळून आले.
फिर्यादीने शेत पिकवू नये, त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान व्हावे घरातील व्यक्तींचा मोठ्या प्रमाणात घात पात व्हावा दुखापत घडवून आणण्याच्या उद्देशाने अशा प्रकारचे अघोरी कृत्य घडत असल्याचे फिर्यादी हनुमंत माणिक शिंदे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.
Share This