• Total Visitor ( 704408 )
News photo

स्मशानभूमी रस्त्यावरील कच-यामुळे कोंढापुरी गावाच्या सौंदर्याला बाधा    

Raju tapal September 04, 2025 98

स्मशानभूमी रस्त्यावरील कच-यामुळे कोंढापुरी गावाच्या सौंदर्याला बाधा    



विजय ढमढेरे (प्रतिनिधी)

शिक्रापूर (प्रतिनिधी) :- शिरूर तालुक्यातील कोंढापुरी येथील स्मशानभूमी रस्त्यावरील कच-यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणा-या नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे.

कोंढापुरी गावाला नुकताच स्मार्ट ग्राम पुरस्कार मिळाला आहे असे समजते.

कोंढापुरी येथील गावचे कुलदैवत खंडोबा मंदीर स्मशानभूमी पासून जवळच असून पाझर तलावही खंडोबा मंदीराजवळच आहे.

ग्रामपंचायतीच्या सहकार्याने ग्रामविकास फाऊंडेशनने खंडोबा मंदीर मल्हार गडावर तसेच स्मशानभूमी परिसरात विविध प्रकारची झाडे लावून कोंढापुरीच्या निसर्गसौंदर्यात भर पाडली आहे.

खंडोबा गडावर लहान मुलांसाठी व्यायामासाठी ग्रामपंचायतीने घसरगुंडी, सिसाॅ,झोके आदींची सोय केली आहे. खंडोबा मंदीर प्रांगणात फुलझाडे लावण्यात आल्याने तसेच पाझर तलावाचा धबधबा पावसाळ्यात प्रवाहीत होत असल्याने निसर्गसौंदर्यात आणखीनच भर पडत आहे. पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी कोंढापुरीचे निसर्गसौंदर्य पाहाण्यासाठी बाहेरील ग्रामस्थांचे कोंढापुरी गावाला भेट देण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे.

कोंढापुरी ग्रामविकास फाऊंडेशनला नुकताच माजी आमदार स्व.बाबुराव दौंडकर स्मारक समिताचाही पुरस्कार मिळाला आहे.

स्मशानभूमीकडे जाणा-या रस्त्यावर तसेच रस्त्याच्या कडेला असलेल्या कच-यामुळे कोंढापुरी गावाच्या निसर्गसौंदर्याला बाधा होत आहे.

स्मशानभूमीकडे जाणा-या रस्त्यावर असलेल्या कच-यामुळे दशक्रिया विधीसाठी जाणा-या, दशक्रिया विधी आटोपून येणा-या नागरिक,ग्रामस्थ तसेच बाहेरील गावावरून आलेल्या पाहुणे मंडळींना दुर्गंधीचा त्रास सहन करत या रस्त्यावरून प्रवास करावा लागतो.

रस्त्यावर असलेल्या कच-यामुळे स्मार्टग्रामला होत असलेली बाधा टाळण्यासाठी कोंढापुरी ग्रामपंचायतीने स्मशानभूमी रस्त्यावरील कच-याची विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.

   


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026