• Total Visitor ( 429380 )
News photo

बिबट्याच्या हल्ल्यातून शेळीला जीवदान; खंडाळे गाव शेती शिवारातील घटना

Raju tapal June 05, 2025 425

बिबट्याच्या हल्ल्यातून शेळीला जीवदान; खंडाळे गाव शेती शिवारातील घटना



शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- बिबट्याने शेळीवर केलेल्या अचानक हल्ल्यात शेळीला जीवदान मिळाल्याची घटना पुणे जिल्ह्यातील  शिरूर तालुक्यातील खंडाळे या खेडेगावात आज बुधवार दि.४ जून २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली.

एका शेळीवर अचानक बिबट्याने हल्ला चढवला. मात्र, शेतातील या भयावह परिस्थितीत शेळीचे नशीब बलवत्तर म्हणून तिला जीवदान मिळाले.

या घटनेची सविस्तर माहिती अशी शिरूर तालुक्यातील खंडाळे या खेडेगावातील  शेतकरी संपतराव गणपत दरवडे यांच्या शेळ्या नेहमीप्रमाणे सकाळी शेजारच्या माळरानावर चारण्यासाठी सोडण्यात आल्या होत्या. संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घराकडे परतत असताना एका शेतक-याच्या ऊसातून अचानक बिबट्या बाहेर आला आणि थेट एका शेळीवर झडप घातली. बिबट्याच्या या आक्रमणामुळे इतर शेळ्या पळून गेल्या. पण बिबट्याने पकडलेली शेळी जोरजोराने ओरडू लागली. तिच्या आवाजामुळे जवळच काम करत असलेले शेतकरी संपतराव गणपत दरवडे आणि त्यांचा नातू १२ वर्षीय साहिल ईश्वर दरवडे सावध झाले.

साहिल ईश्वर दरवडे आणि त्याची ६५ वर्षीय आज्जी रंजनाबाई संपतराव दरवडे यांनी आरडाओरड करून, बिबट्याच्या मागे पळून, दगड मारल्याने बिबट्याने शेळीला सोडून दिले.त्यानंतर बिबट्या ऊसाच्या शेतात पळून गेला. बिबट्याने पकडलेल्या शेळीला थोडी जखम झाली  उपचार केल्यानंतर ती पुन्हा ठीक झाल्याचे बागायतदार शेतकरी जयसिंग संपतराव दरवडे‌ यांनी' टिटवाळा न्यूज "शी बोलताना सांगितले.

या घटनेमुळे गावकऱ्यांमध्ये बिबट्याच्या दहशतीबाबत चिंता तसेच भीती वाढली असून शेळीचे सुदैव आणि आजी -नातवाचे प्रसंगावधान यामुळे आज एक जीव वाचला अशी प्रतिक्रिया बागायतदार शेतकरी जयसिंग संपतराव दरवडे यांनी "टिटवाळा न्यूज" शी बोलताना व्यक्त केली.



प्रतिनिधी:- विजय ढमढेरे (कोंढापुरी ता‌.शिरूर)

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement