• Total Visitor ( 631404 )
News photo

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज संकटावर सरकार ॲक्शन मोडवर

Raju Tapal publisher July 09, 2026 19

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज संकटावर सरकार ॲक्शन मोडवर



सिंधुदुर्गासाठी विशेष मनुष्यबळ व साहित्य रवाना



मुख्यमंत्री कार्यालयाने पालकमंत्री नितेश राणे यांच्या मागणीनुसार घेतली तातडीने बैठक



सांगली,सातारा,बारामती या ठिकाणाहून कामगारांची विशेष पथके सिंधुदुर्गात रवाना



मोडलेले पोल तातडीने उभे करून वीज पुरवठा केला जाणार सुरळीत



पालकमंत्री नितेश राणे आणि मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव लोकेश चंद्रा यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स घेत दिल्या सूचना



राज्याच्या मेजर स्टोअर मधून आवश्यक ते साहित्य पुरविण्याच्याही दिल्या सूचना



मुख्यमंत्री कार्यालयाकडून तातडीच्या उपायोजनांमुळे सिंधुदुर्ग वासियांना दिलासा



सिंधुदुर्ग:-मुख्यमंत्री कार्यालयाचे अप्पर मुख्य सचिव लोकेश चंद्रा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाऊस व वादळी वाऱ्यात पडझड होऊन वीजपुरवठा खंडित होण्याच्या कारणांचा आढावा घेतला. मोडलेले पोल पुन्हा उभे करण्यासाठी सातारा,बारामती,सांगली अशा ठिकाणाहून कामगारांची विशेष पथके सिंधुदुर्गात पाठविली जाणार आहेत. युद्ध पातळीवर पोल उभे करून ज्या गावांमध्ये वीज पुरवठा खंडित झालेला आहे त्या गावांना वीजपुरवठा सुरळीत करण्याच्या सूचना दिल्या. तर राज्याच्या मेजर स्टोअर मधून सिंधुदुर्गाला लागणारे ट्रांसफार्मर व इतर साहित्य पाठवून देण्याच्या सूचनाही यावेळी मुख्यमंत्री कार्यालयाचे,वीज वितरण विभागाचे अप्पर मुख्य सचिव लोकेश चंद्रा यांनी दिल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही गावांमध्ये विजेचा पुरवठा खंडित झाल्याची दखल मुख्यमंत्री कार्यालयाकडून घेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनतेला दिलासा देण्याचे काम केलेले आहे. यंत्रणा सज्ज करून वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्यासंदर्भात उपाययोजना करण्यात आल्या आहेत.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement