• Total Visitor ( 430262 )
News photo

७ नोव्हेंबरला शिरूर येथे सामुहिक वंदे मातरम् गीताचे गायन 

Raju tapal October 30, 2025 64

७ नोव्हेंबरला शिरूर येथे सामुहिक वंदे मातरम् गीताचे गायन 

         

शिक्रापूर (प्रतिनिधी):- वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ७ नोव्हेंबर २०२५ रोजी शिरूर शहरातील रयत शाळेच्या मैदानावर सामुहिक वंदे मातरम् गीताचे गायन तसेच इतर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या नियोजनासंदर्भात शिरूर तहसीलदार कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यासंदर्भात तालुकास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली असून तहसिलदार बाळासाहेब म्हस्के अध्यक्ष असून संतोष गोसावी सचिव आहेत‌. नायब तहसीलदार प्रकाश मुसळे,गटशिक्षणाधिकारी बाळकृष्ण कळमकर,विठ्ठल वाघ,संजय पारडे,दिनकर जाधव,मुख्याध्यापक झेंडू पवार,ए के परदेशी,प्रा.सतिश धुमाळ,अर्जून खराबे,बापूराव जगन्नाथ मोहर,एम एस गायकवाड,प्राचार्य संजय मचाले,स्नेहल शिंदे हे नियोजनासंदर्भात तहसीलदार कार्यालयात झालेल्या बैठकीस उपस्थित होते. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय रचित वंदे मातरम् या भारताच्या राष्ट्रीय गीताच्या निर्मितीला दीडशे वर्षे पूर्ण होत आहेत.त्यानिमित्ताने ७ नोव्हेंबरला वंदे मातरम् गीताच्या सर्व कडव्यांचे  गायन होणार असल्याचे प्रा‌.सतिशराव धुमाळ यांनी सांगितले.

         


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement