गुजर प्रशालेच्या विद्यार्थ्यांचे पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत घवघवीत यश
शिक्रापूर (प्रतिनिधी) :- शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील स्वातंत्र्यसैनिक रायकुमार बी गुजर प्रशालेतील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे आयोजित पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी २०२५ या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.
या परीक्षेसाठी प्रशालेतून एकूण ११३ विद्यार्थी बसले होते त्यापैकी ४३ विद्यार्थी पात्र झाले आहेत आणि सात विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्राप्त झाली आहे.
प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे यांनी ही माहिती "टिटवाळा न्यूज"ला दिली.
शिष्यवृत्ती प्राप्त झालेले विद्यार्थी खालील प्रमाणे :-
नांदखिले श्रुतिका महेश 256 गुण,
सातपुते समृद्धी किरण 236 गुण,
थोरात रुद्र सुभाष 222 गुण,
गोफणे ओंकार साहेबराव 222गुण,
वाघमारे कार्तिक महेश 220 गुण,
अक्कर रुद्रांश संजय 216 गुण,
कुंभकर्ण समर्थ महेश 212 गुण.
या सर्व विद्यार्थ्यांना प्रशालेच्या उपशिक्षिका रूपाली ढमढेरे,मनीषा गवारे,सोनाली शेळके,सरला ढमढेरे,राजेंद्र भगत,विजय राऊत व रवींद्र सातपुते यांचे मार्गदर्शन लाभले.
शिष्यवृत्ती प्राप्त झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे प्रशालेचे मुख्याध्यापक अशोक दहिफळे, उपमुख्याध्यापिका सुनीता पिंगळे,पर्यवेक्षक मोहन उमासे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांनी कौतुक केले.
शिष्यवृत्तीधारक सर्व विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळ तळेगाव ढमढेरेचे अध्यक्ष कौस्तुभकुमार गुजर, मानद सचिव अरविंददादा ढमढेरे, उपाध्यक्ष श्रीकांत सातपुते, ज्येष्ठ संचालक विजयराव ढमढेरे, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेशबापू ढमढेरे यांनी सदिच्छा व्यक्त करून शुभेच्छा दिल्या.
.