• Total Visitor ( 452118 )
News photo

ढोकसांगवी येथे आजपासून हरिनाम सप्ताह 

Raju Tapal publisher March 26, 2026 17

ढोकसांगवी येथे आजपासून हरिनाम सप्ताह 

          

शिक्रापूर:-शिरूर तालुक्यातील ढोकसांगवी येथील ग्रामस्थांनी आज दि.२६ मार्चपासून अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचे आयोजन केले आहे. व्यासपीठचालक ह.भ.प.सोमनाथबाबा महाराज आगरकर (आळंदी) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या हरिनाम सप्ताह सोहळ्यात दररोज पहाटे ४ ते सकाळी ६ काकडा भजन,सकाळी ७ ते ८ विष्णू सहस्त्रनाम,सकाळी ८ ते ११ ज्ञानेश्वरी पारायण,सकाळी ११ ते १२ गाथाभजन, सायंकाळी ४ ते ५ प्रवचन,सायंकाळी ५ ते ६.३० हरिपाठ,रात्री ७ ते ९ कीर्तन,रात्री ११ ते पहाटे ४ वाजेपर्यंत हरिजागर असे दैनंदिन कार्यक्रम पार पडणार आहेत असे ढोकसांगवी येथील ग्रामस्थांनी कळविले आहे.

ह.भ.प.भास्करमहाराज सरोदे,कुमारी ह.भ.प.मेघामहाराज रमेश पाचंगे,ह.भ.प.चंद्रकांत महाराज श्रीमंत,ह.भ.प.ठकाराम महाराज मलगुंडे,ह.भ.प.विष्णू महाराज पोंदाळ या प्रवचनकारांचे प्रवचन,ह.भ.प. सर्जेराव महाराज काळे,ह.भ.प.उद्धव महाराज चोले,ह.भ.प.विनोद महाराज रोकडे,ह.भ.प.अर्चनाताई साळूंके,ह.भ.प.रेश्माताई विनोद काकडे,ह.भ.प.सागरमहाराज बोराटे,ह.भ.प.प्रदीप महाराज बोराटे या कीर्तनकारांचे कीर्तन हरिनाम सप्ताह काळात पार पडणार असून बुधवार दि.१ एप्रिलला दिंडी सोहळा व दीपोत्सव कार्यक्रमाचे आयोजन ढोकसांगवी ग्रामस्थांनी केले आहे. गुरूवार दि.२ एप्रिलला सकाळी ९ ते ११ यावेळेत ह.भ.प.मधूकरमहाराज शिंगाडे यांचे काल्याचे कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचे अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याचा समारोप होणार आहे असे ढोकसांगवी ग्रामस्थांनी कळविले आहे. ढोकसांगवी, शेळकेमळा, सोनेसांगवी,पिंपळे धुमाळ,वाघाळे,सरदवाडी,कारेगाव,बाभुळसर खुर्द,पिंपरी दुमाला,रामलिंग, काळेमळा, मांडवगण फराटा,डांगे मळा येथील भजनी मंडळाचा हरिजागर हरिनाम सप्ताह सोहळ्यात होणार असून भारतीय जनता पार्टी उद्योग आघाडी प्रदेशाध्यक्ष संजय शिवाजीराव पाचंगे,माजी ग्रामपंचायत सदस्य रखमाजी‌ दत्तोबा मलगुंडे या भालदार - चोपदारांची साथ हरिनाम सप्ताह सोहळ्यास लाभणार आहे.

       


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement