• Total Visitor ( 435269 )
News photo

अॅनिमिया मुक्त गाव अभियानांतर्गत शिक्रापूर येथे महिलांची आरोग्य तपासणी 

Raju tapal November 28, 2025 82

अॅनिमिया मुक्त गाव अभियानांतर्गत शिक्रापूर येथे महिलांची आरोग्य तपासणी 

   

शिरूर:- अॅनिमिया मुक्त गाव अभियानांतर्गत शिरूर तालुक्यातील शिक्रापूर येथे महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. पुणे जिल्हा परिषद,पंचायत समिती शिरूर,मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत आरोग्य उपकेंद्र शिक्रापूर,ग्रामपंचायत शिक्रापूर यांच्या वतीने शिक्रापूर (ता‌.शिरूर ) येथे अॅनिमिया मुक्त गाव अभियान राबविण्यात आले. या अभियानांतर्गत १५० पेक्षा जास्त महिलांची हिमोग्लोबिन,ब्लडप्रेशर,शुगर तपासणी करण्यात आली. समुदाय अधिकारी डाॅ.प्रतिक्षा आठवले,नयना जाधव सिस्टर,आरोग्य सेवक पवन भवर,आशा वर्कर अर्चना गायकवाड,कल्याणी वाबळे,सुवर्णा तांबे,कविता राऊत,कल्पना ढोकले‌ यांनी महिलांची आरोग्य तपासणी केली. शिक्रापूर गावचे सरपंच रमेशराव गडदे‌,उपसरपंच वंदनाताई भुजबळ,ग्रामपंचायत सदस्य त्रिनयन‌ कळमकर,सुभाष खैरे,विशाल खरपुडे,मयूर करंजे,कृष्णा सासवडे,प्रकाश वाबळे,उषा राऊत,पुजाताई भुजबळ,सारिकाताई सासवडे,शालनताई राऊत,मोहिनीताई मांढरे,सीमाताई लांडे,ग्रामपंचायत अधिकारी नंदकुमार वैद्य,ग्रामपंचायत कर्मचारी अनंता दरवडे‌ अॅनिमिया मुक्त गाव अभियानात सहभागी झाले होते.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement