• Total Visitor ( 593724 )
News photo

होमगार्ड महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लंपास; शिरूर मधील घटना 

Raju tapal June 06, 2025 87

होमगार्ड महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लंपास; शिरूर मधील घटना 



शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- होमगार्ड महिलेच्या गळ्यातील सुमारे ७० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे गंठण लंपास झाल्याची घटना शिरूर मधील प्रितम प्रकाशनगरमध्ये घडली.

शिरूर यैथील प्रितम प्रकाशनगरमधील ५५ वर्षीय चंदाबाई बबन चव्हाण यांचा १ जून रोजी वाढदिवस होता.वाढदिवसाच्या दिवशी त्यांनी पाहुणे मंडळी, महिलांसाठी संध्याकाळी त्यांच्या घरी जेवणाचे आयोजन केले होते.जेवण झाल्यानंतर रात्री ११ वाजण्याच्या सुमारास चंदाबाई हात धुण्यासाठी घराच्या पार्किंग मध्ये गेल्या असताना दोन अनोळखी चोरट्यांनी त्यांच्या दिशेने येवून त्यांच्या गळ्यातील सुमारे ७० हजार रूपये किंमतीचे सोन्याचे गंठण हिसकावून अंधाराचा फायदा घेऊन मोटरसायकल वरून न्हावरेफाट्याच्या दिशेने पोबारा केला.

पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस चोरीच्या या घटनेचा तपास करत आहेत.



प्रतिनिधी :- विजय ढमढेरे (कोंढापुरी ता‌.शिरूर)

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement