• Total Visitor ( 593727 )
News photo

२०२४-२५ च्या संच मान्यतेला माननीय उच्च न्यायालयाची स्थगिती

Raju tapal May 06, 2025 129

२०२४-२५ च्या संच मान्यतेला माननीय उच्च न्यायालयाची स्थगिती...‌



पुढील सुनावणी जून मध्ये होणार...



सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शिक्षकांनी नवीन संचमान्यतेचा शासन निर्णय 15 मार्च 2024 ला आव्हान देणाऱ्या याचिकेत शासनाला आहे ती परिस्थिती ठेवण्याचे उच्चं न्यायालयाचे अंतरिम आदेश 

नवीन संचमान्यतेचा शासन निर्णय 15 मार्च 2024 ला आव्हान देणाऱ्या 2 याचिका ऍड बालाजी शिंदे यांच्याकडून दाखल केल्या. आज मुंबई येथे दोन्ही याचिकांची सुनावणी पार पडली . याचिकेतील उपस्थित केलेले मुद्दे व युक्तिवाद विचारात घेऊन आज दिनांक: ०६/०५/२०२५ रोजी उच्च न्यायालयाने महाराष्ट शासनाला व सर्व प्रतिवाद्यांना संचमान्यतेबाबत आज आहे ती परिस्थिती ठेवण्याचे अंतरिम आदेश पारित केले. पुढील सुनावणी जून मध्ये होईल. या आदेशामुळे नवीन संचमान्यतेनुसार याचिकाकर्त्यांना अतिरिक्त ठरवता येणार नाही.



महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement