• Total Visitor ( 435830 )
News photo

जि.प.शाळा, सालोरा बु येथे IAS अधिकारी यांची भेट

Raju tapal September 25, 2025 136

जि.प.शाळा, सालोरा बु येथे IAS अधिकारी यांची भेट



तिवसा/अमरावती :- दि. २३ / ०९ /२०२५ ला जि.प.पूर्व माध्यमिक शाळा, सालोरा बु. येथे मा.कौशल्या एम् IAS अधिकारी यांनी भेट दिली. त्यांनी संपूर्ण शाळा, परिसर स्वच्छता, आणि वर्गातील मुलांची प्रगती याची पाहणी केली. शाळेतील मुलांशी व शिक्षकांशी निपूण भारत उपक्रमांतर्गत प्रगती बद्दल संवाद साधला. शाळेचा परिसर, शालेय स्वच्छता आणि विद्यार्थ्यांच्या प्रगती बद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी मा.अभिषेक कासोदे गटविकास अधिकारी, मा. नारायण आमझरे सहा.गटविकास अधिकारी, मा.डॉ.नितीन उंडे गटशिक्षणाधिकारी, मा.अतुल देशमुख गटसमन्वयक सोबत उपस्थित होते. गावच्या सरपंच ममताताई जाधव यांनी मा. कौशल्या एम. IAS अधिकारी यांचे शाल आणि पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. तसेच मा.कासोदे, गटविकास अधिकारी, मा.आमझरे, सहा.गटविकास अधिकारी. मा.डॉ.नितिन उंडे यांचेही पुष्पगुच्छ देवून स्वागत करण्यात आले. शाळेचे मुख्याध्यापक गजानन काकडे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळल्याबद्दल मा.कौशल्या एम,IAS अधिकारी यांचे हस्ते शाल व पुष्पगुच्छ देवून सन्मानित करण्यात आले. मा.अधिकारी वृंद यांनी शाळेच्या बोलक्या भिंती, शालेय परिसर स्वच्छता आणि विद्यार्थी प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.



 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement