महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीची अमरावती येथे महत्त्वपूर्ण बैठक
राज्य पदाधिकारी यांची विविध विषयांवर चर्चा
अमरावती :- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्य नेते उदय शिंदे सर,राज्य सरचिटणीस राजन कोरगावकर सर,राज्य कार्यकारिणी सचिन सचिन मदने सर आणि राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी अमरावती येथे सदिच्छा भेट दिली. या भेटीनंतर उपस्थित सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांसमवेत प्राथमिक शिक्षकांच्या विविध प्रलंबित आणि न्याय्य हक्कांच्या मागण्यांवर सखोल विचारविनिमय व महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली.यावेळी राज्य पदाधिकारी यांचा जिल्हा शाखेच्यावतीने शाल व बुके देऊन सत्कार करण्यात आला.
या वेळी प्रमुख विषयांवर झाली धडाकेबाज चर्चा झाली यामध्ये विदर्भातील शाळा सुरु करण्याच्या न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत करून या लढ्यात सहभागी अमरावती जिल्हाच्या पदाधिकारी यांचे स्वागत करण्यात आले. TET (शिक्षक पात्रता परीक्षा) च्या रखडलेल्या प्रश्नांवर मार्ग काढणे. शिक्षकांच्या रखडलेल्या पदोन्नती (प्रमोशन) प्रक्रियेला गती देणे.पदवीधर वेतनश्रेणी त्वरित लागू करणे. शिक्षकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न— जुनी पेन्शन योजना (OPS) लागू करणे.तसेच शाळा अनुदान,गणवेश अनुदान,शिक्षकांची रीक्त पदे,वैद्यकीय व इतर बिला करीता अनुदान,सर्व प्रकारच्या पदोन्नती इतर विषयावर चर्चा करण्यात आली आगामी काळात शिक्षकांनी प्रलंबित प्रश्न करीता आंदोलना करीता तयार राहावे असे आवाहन राज्यनेते उदय शिंदे यांनी केले. ही सभा 12जून 2026 ला महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती चे राज्य नेते उदयजी शिंदे सर, राजनजी कोरगावकर सर (राज्य सरचिटणीस,महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती), सचिनभाऊ मदने सर (राज्य कार्यालयीन सचिव ) यांच्या उपस्थित झाली,यावेळी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा अमरावती च्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आले. यावेळी गोकुलदासजी राऊत सर (जिल्हा शिक्षक नेते), मा.अजयानंद पवार (जिल्हाध्यक्ष ),राजेशजी सावरकर (राज्य प्रसिद्धी प्रमुख ),संभाजी रेवाळे (जिल्हा मार्गदर्शक ) शैलेंद्र स. दहातोंडे (जिल्हा सरचिटणीस ), तुळशीदास धांडे (तालुकाध्यक्ष दर्यापूर ),नितीन देशमुख (तालुकाध्यक्ष,अमरावती ),उमेश चुनकिकर (तालुकाध्यक्ष भातकुली ),सुनील बोकाडे (तालुकाध्यक्ष तिवसा ) संतोष राऊत (तालुका सरचिटणीस भातकुली )इलियास खान (तालुकाध्यक्ष, NPS सेल भातकुली ), राहुल वानखडे (तालुका सरचिटणीस, तिवसा ),प्रफुल होले (तालुका सरचिटणीस,अमरावती ),उपस्थित होते,यावेळी मा. उदयजी शिंदे सर, मा.राजनजी कोरेगावकर सर यांनी मार्गदर्शन केले,कार्यक्रमाचे संचालन शैलेंद्र स. दहातोंडे यांनी तर आभार प्रदर्शन अजयानंद पवार सर यांनी केले.तसेच समितीचे अनेक शिक्षक आणि प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षकांच्या न्याय्य हक्कांसाठी संघटितपणे आणि तीव्रतेने लढा देण्याचा निर्धार या बैठकीत एकमुखाने व्यक्त करण्यात आला असे शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी कळविले आहे.
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिति की अमरावती में महत्वपूर्ण बैठक
राज्य पदाधिकारियों ने विभिन्न मुद्दों पर की विस्तृत चर्चा
अमरावती :- महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिति के राज्य नेता उदय शिंदे सर,राज्य महासचिव राजन कोरगांवकर सर,राज्य कार्यालयीन सचिव सचिन मदने सर तथा राज्य प्रचार-प्रसार प्रमुख राजेश सावरकर ने अमरावती में सदिच्छा भेंट दी। इस अवसर पर उपस्थित प्रमुख पदाधिकारियों के साथ प्राथमिक शिक्षकों की विभिन्न लंबित एवं न्यायोचित मांगों पर विस्तृत विचार-विमर्श और महत्वपूर्ण चर्चा की गई। जिला शाखा की ओर से राज्य पदाधिकारियों का शॉल एवं पुष्पगुच्छ देकर स्वागत एवं सम्मान किया गया।बैठक में कई महत्वपूर्ण विषयों पर गंभीर चर्चा हुई। विदर्भ क्षेत्र में विद्यालय प्रारंभ करने संबंधी न्यायालय के निर्णय का स्वागत किया गया तथा इस संघर्ष में सहभागी अमरावती जिला पदाधिकारियों का अभिनंदन किया गया। साथ ही शिक्षक पात्रता परीक्षा (TET) से संबंधित लंबित समस्याओं के समाधान, शिक्षकों की लंबित पदोन्नति प्रक्रिया को गति देने,पदवीधर वेतनश्रेणी शीघ्र लागू करने तथा शिक्षकों की लंबे समय से लंबित मांग पुरानी पेंशन योजना (OPS) लागू करने जैसे विषयों पर चर्चा हुई। इसके अलावा विद्यालय अनुदान,गणवेश अनुदान, शिक्षकों के रिक्त पदों की पूर्ति,चिकित्सा एवं अन्य बिलों के लिए अनुदान तथा विभिन्न प्रकार की पदोन्नतियों से जुड़े मुद्दों पर भी विचार-विमर्श किया गया। राज्य नेता उदय शिंदे ने शिक्षकों से अपील की कि वे अपनी लंबित मांगों के समाधान हेतु भविष्य में होने वाले आंदोलनों के लिए तैयार रहें। यह सभा 12 जून 2026 को महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिति के राज्य नेता उदयजी शिंदे सर,राज्य महासचिव राजनजी कोरगांवकर सर तथा राज्य कार्यालयीन सचिव सचिनभाऊ मदने सर की उपस्थिति में आयोजित की गई। महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिति,जिला अमरावती की ओर से उनका स्वागत किया गया।इस अवसर पर गोकुलदासजी राऊत सर (जिला शिक्षक नेता),अजयानंद पवार (जिलाध्यक्ष),राजेशजी सावरकर (राज्य प्रचार-प्रसार प्रमुख),संभाजी रेवाले (जिला मार्गदर्शक), शैलेंद्र एस. दहातोंडे (जिला महासचिव),तुळशीदास धांडे (तालुकाध्यक्ष, दर्यापुर), नितीन देशमुख (तालुकाध्यक्ष,अमरावती),उमेश चुनकीकर (तालुकाध्यक्ष,भातकुली),सुनील बोकाडे (तालुकाध्यक्ष,तिवसा),संतोष राऊत (तालुका महासचिव,भातकुली),इलियास खान (तालुकाध्यक्ष, NPS सेल,भातकुली),राहुल वानखडे (तालुका महासचिव,तिवसा) तथा प्रफुल होले (तालुका महासचिव,अमरावती) सहित अनेक पदाधिकारी उपस्थित थे।बैठक में उदयजी शिंदे सर और राजनजी कोरगांवकर सर ने मार्गदर्शन किया। कार्यक्रम का संचालन शैलेंद्र एस. दहातोंडे ने किया तथा आभार प्रदर्शन अजयानंद पवार सर ने किया। समिति के अनेक शिक्षक एवं पदाधिकारी बड़ी संख्या में उपस्थित रहे। बैठक में शिक्षकों के न्यायोचित अधिकारों के लिए संगठित होकर और अधिक प्रभावी ढंग से संघर्ष करने का संकल्प सर्वसम्मति से व्यक्त किया गया। यह जानकारी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिति के राज्य प्रचार-प्रसार प्रमुख राजेश सावरकर ने दी।