देवशयनी एकादशी दिनी इंद्रायणी आरती हरिनाम गजरात
हजेरी मारुती मंदिरात माऊलींची पालखी;कीर्तन सेवा
आळंदी :- येथील इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती सेवा समितीचे वतीने इंद्रायणी नदी घाटावर इंद्रायणी आरती हरिनाम गजरात झाली. तत्पूर्वी महिला साधकांनी रांगोळी काढत सामाजिक बांधिलकी जोपासली. हजेरी मारुती मंदिरात माऊलींची पालखी हरिनाम गजरात विसावली. ग्राम पदक्षीणेतील कीर्तन सेवा युवा कीर्तनकार चक्रांकित महाराज यांनी रुजू केली. कीर्तन सेवा प्रसंगी श्री हजेरी मारुती मंदिरात भाविकांची श्रींचे दर्शनास मोठी गर्दी झाली होती. येथे श्री हजेरी मारुती मंदिर आळंदीकर ग्रामस्थ,नवशिवशक्ती तरुण मंडळाचे पदाधिकारी यांनी परिश्रम पूर्वक नियोजन केले. प्रसाद वाटप,नित्यनैमित्तक श्री हजेरी मारुती आरती,हनुमान स्तोत्र,हनुमान चालीसा,श्रींचे आरती उत्साहात झाली.माऊलींची पालखी इंद्रायणी नदी ला महापूर आल्याने श्री राम घाट मार्गे हरिनाम जयघोष करीत मंदिरात विसावली. मंदिरात देवस्थानचे वाटणे मानकरी, सेवक,खांदेकरी ग्रामस्थ यांचा नारळ प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी आळंदीकर ग्रामस्थ,खांदेकरी याणी श्रींची पालखी खांद्यावर घेत ग्राम प्रदक्षिणा परंपरेने पूर्ण केली. विविध ठिकाणी श्रींचे पालखीचे स्वागत,पुष्पवृष्टी करीत आळंदीकर ग्रामस्थ देवस्थानचे माजी विश्वस्त डॉ.सारंग जोशी आदींनी केले. नित्य नैमित्तिक इंद्रायणी आरती देवशयनी एकादशी दिनी हरिनामाचा जयघोष केला. भाविकांना धार्मिक पर्वणी लाभल्याचे आळंदीकर ग्रामस्थांनी सांगितले. इंद्रायणी आरती सेवा समिती तर्फे दर एकादशीला होणारी इंद्रायणी आरती उत्साहात झाली. घाटावर उपवासाचे पदार्थासह केळी वाटप भाविकांना आरती नंतर करण्यात आले. घाटावर भाविकांना पावसाने इंद्रायणी नदी ला महापूर आल्याने घाटावर भाविकांना जाण्यास दक्षता घेत मनाई करण्यात आली होती. मोजक्या महिला नागरिकांनी आरती केली. आरती सेवा समितीच्या वतीने इंद्रायणी नदी काठावर देवशयनी एकादशी निमित्त इंद्रायणी आरती हरिनाम गजरात झाली. या प्रसंगी राजमाता जिजाऊ महिला प्रतिष्ठान अध्यक्षा संयोजिका अनिता झुजम,आळंदी जनहित फाउंडेशन कार्याध्यक्ष संयोजक अर्जुन मेदनकर,महिला पदाधिकारी सावित्री घुंडरे,पुष्पा लेंडघर,नीलम कुरधोंडकर,शोभा कुलकर्णी,सरस्वती भागवत, भागीत्रा भागवत,उषा पाटील,स्वाती पाचुंदे,जयश्री मुसळे,सुरेखा कुऱ्हाडे,सुवर्णा काळे,अपूर्वा भागवत,माऊली घुंडरे पाटील,राजेश नागरे,सोमनाथ बेंडाले,अमर गायकवाड,बाबुराव मोरे,गोविंद ठाकूर आदी उपस्थित होते.