• Total Visitor ( 391594 )
News photo

इंगळेनगर रस्त्याची दुरवस्था 

Raju tapal February 10, 2026 24

इंगळेनगर रस्त्याची दुरवस्था 

          

शिक्रापूर:- शिरूर तालुक्यातील इंगळेनगर - दहीवडी रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. या रस्त्यावरील डांबरीकरण ब-याच ठिकाणी खराब झाले आहे. हा रस्ता दहीवडी येथे न्हावरे -तळेगाव ढमढेरे रस्त्याला जोडलेला असून दहीवडी येथे तळेगाव ढमढेरे - न्हावरे‌  रस्त्याचे उरळगाव घाट परिसर वगळता सिमेंटीकरणाचे काम करण्यात आलेले आहे. इंगळेनगर -दहीवडी‌ रस्त्यावरून न्हावरे गावाकडे जाण्या - येण्यासाठी श्री.क्षेत्र रांजणगाव गणपती,खेडकर वस्ती,करंजावणे,इंगळेनगर गावांतील प्रवासी,ग्रामस्थ प्रवास करत असतात. श्री.क्षेत्र रांजणगाव गणपती येथे पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकांपैकी प्रसिद्ध महागणपतीचे देवस्थान असून न्हावरे‌,निर्वी, आंधळगाव, चिंचणी,शिरसगाव काटा,आलेगाव पागा,उरळगाव परिसरातील ग्रामस्थ महागणपतीचे दर्शन घेण्यासाठी श्री.क्षेत्र रांजणगावला येण्यासाठी जवळचा रस्ता म्हणून इंगळेनगर येथील रस्त्याचा वापर करत असतात. इंगळेनगर रस्त्याचे डांबरीकरण करणे अतिशय गरजेचे आहे.

प्रतिनिधी:- विजय ढमढेरे


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement