कल्याणात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या केडीएमसी निवडणुकीच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती गोलवली येथील राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयात पार पडल्या. कल्याण डोंबिवली महापालिका सार्वत्रिक निवडणुका सन 2025 रोजी 15 जानेवारीला होणार आहे. प्रत्येक पक्षांच्या वतीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीं सुरू आहेत.
त्या प्रमाणे राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती गोलवली येथील राष्ट्रवादीच्या जनसंपर्क कार्यालयात राष्ट्रवादीचे महाराष्ट्र प्रदेश प्रवक्ते महेश तपासे,जिल्हा अध्यक्ष वंडार पाटील,महिला जिल्हा अध्यक्षा सारीका गायकवाड, कल्याण पश्चिम विधानसभा अध्यक्ष स्वप्नील रोकडे,राजेश शिंदे यांच्या उपस्थितीत मध्ये मुलाखती पार पडल्या. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष डॉ.वंडार पाटील यांनी सांगितले की राष्ट्रवादी मध्ये अनेक जण इच्छुक आहेत. आतापर्यंत 80 इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. आणखीनही काही इच्छुक उमेदवार मुलाखतीसाठी येणार आहेत. आमची महाविकास आघाडी होईल असे मला वाटते. त्या प्रमाणे जागा वाटप होतील. महाविकास आघाडीचा निर्णय वरिष्ठ घेतील.परंतु आमच्या परीने आम्ही तयारी केली आहे. महाविकास आघाडी झाली तर चांगल्याप्रकारे यश येईल असे सांगितले. यावेळी भाजपाकडून तिकिट मिळणार नाही म्हणून काही भाजपाच्या काही पदाधिकारी यांनी सुध्दा मुलाखती दिल्या आहेत. राष्ट्रवादीच्या उमेदवारांवर अन्याय होता कामा नये या सर्व बाबी तपासूनच इतर पक्षांच्या उमेदवाराचा विचार केला जाईल असे जिल्हा अध्यक्ष वंडार पाटील यांनी सांगितले.