• Total Visitor ( 624216 )
News photo

ग्रामसेवक संघटनेच्या हवेली तालुकाध्यक्ष पदी जालिंदर बोरावने...

Raju Tapal publisher July 03, 2026 25

ग्रामसेवक संघटनेच्या हवेली तालुकाध्यक्ष पदी जालिंदर बोरावने....



जि.प.सदस्य पै.किरण साकोरे यांच्या हस्ते सत्कार



फुलगाव/गौतम पाटोळे:- लोणीकंद ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी जालिंदर बोरावने यांची ग्रामसेवक संघटनेच्या हवेली तालुकाध्यक्ष पदी निवड पार पडली.यावेळी ग्रामसेवक संघटनेची तालुक्याची नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली. तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल बोरावने यांचा सत्कार लोणीकंद ग्रामपंचायत कार्यालयात लोणीकंद-पेरणे गटाचे जिल्हा परिषद सदस्य पै.किरण साकोरे,लोणीकंदचे माजी आदर्श सरपंच श्रीकांत कंद यांच्या हस्ते पार पडला.याप्रसंगी माजी उपसरपंच गजानन कंद,कंत्राटदार तथा उद्योजक नानासाहेब वराळे,जय कंद,माजी ग्रामपंचायत सदस्य रुपेश गावडे,आदी मान्यवर उपस्थित होते.

यामध्ये ग्रामसेवक संघटनेच्या हवेली तालुक्याच्या नूतन कार्यकारणीमद्ये तालुकाध्यक्ष जालिंदर बोरावने,उपाध्यक्ष धीरजकुमार घोटाळे,सचिव संदिप धोत्रे,महिला उपाध्यक्ष स्वाती बोराटे,कोषाध्यक्ष विजयकुमार गरुड,कार्याध्यक्ष अनिल विघने,प्रसिध्दी प्रमुख महादेव वाघ,सदस्य वंदना वाघ,मनीषा ओतारी,आनंद कांबळे,विजय दुसंग,सुजाता पवार यांच्या नूतन निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत.



ग्रामसेवक संघटनेच्या तालुकाध्यक्ष पदी जालिंदर बोरावने यांची निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करताना जि.प.सदस्य पै.किरण साकोरे,आदी मान्यवर.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement