• Total Visitor ( 702273 )
News photo

अ प्रभागाचा कार्यभार स्विकारला जयवंत चौधरी यांनी 

Raju tapal October 14, 2025 130

अ प्रभागाचा कार्यभार स्विकारला जयवंत चौधरी यांनी 



 टिटवाळा :- कल्याण डोंबिवली महापालिकेच्या मंजूर आकृतिबंधानुसार महापालिका आयुक्त अभिनव गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली सामान्य प्रशासन विभागाने अनेक कर्मचाऱ्यांना नुकतीच पदोन्नती दिली यामध्ये वर्ग एक ते चार मधील सर्व संवर्गांच्या समावेशक पदोन्नती द्वारे लिपिकांना वरिष्ठ लिपिक पदावर,वरीष्ठ लिपिकांना अधीक्षक आणि अधिक्षकांना सहाय्यक आयुक्त या पदावर पदोन्नती देण्यात आली.  यामध्ये अ प्रभागाचे सहाय्यक आयुक्त प्रमोद पाटील यांची ब प्रभागात बदली करण्यात आली. तर त्यांच्या जागी फ प्रभागाचे अधीक्षक पदोन्नतीने सहाय्यक आयुक्त पदी बढती मिळालेले जयवंत चौधरी यांना अ प्रभागाचा कारभार हाकण्याचा मान  मिळाला. त्यांनी आज सकाळीच अ  प्रभागाचा पदभार स्वीकारला. अ प्रभागातील अनधिकृत बांधकामे,फेरीवाले,रस्ते इतर सोयीसुविधा यांची मोठी समस्या आहे. त्यातच विविध राजकीय पक्षातील राजकीय दबाव या सर्व गोष्टी चौधरी यांना पेलाव्या लागतील. येत्या काही दिवसांतच ते आपली कामगिरी कशी पार पाडतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. 

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026