• Total Visitor ( 430210 )
News photo

 कल्पेश मनोहर शिंदे सर प्रथम क्रमांकाचे मानकरी आणि जिल्हास्तरासाठी निवड

Raju tapal January 07, 2026 217

सलग तीन वर्षं विजेते तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात 



 कल्पेश मनोहर शिंदे सर प्रथम क्रमांकाचे मानकरी आणि जिल्हास्तरासाठी निवड



पंचायत समिती मुरबाड तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन 5 जानेवारी ते  6 जानेवारी 2026 रोजी आयोजित करण्यात आले होते. या विज्ञान प्रदर्शनात पदमश्री अण्णासाहेब जाधव भारतीय समाज उन्नति मंडळ भिवंडी संचलित तळेगाव विभाग हायस्कूल तळेगाव ता मुरबाड या विद्यालयाचे आणि संस्थेच,शाळेचं,बिलघर गावाचं नाव महाराष्ट्रभर रोशन करणारे कल्पेश माधुरी मनोहर शिंदे यांनी आदर्श भारताचे उद्याचे भावी वैज्ञानिक व गणिततज्ञ घडविण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला आणि सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून माध्यमिक शिक्षक अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य बनवून या स्पर्धेत भाग घेतला होता. या विज्ञान प्रदर्शनात  कल्पेश मनोहर शिंदे हे माध्यमिक शिक्षक अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य या स्पर्धेत सलग तिसऱ्या वर्षी प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. याबद्दल त्यांना गटशिक्षणाधिकारी मा.घोरड साहेब,विस्तार अधिकारी कनकोसे साहेब,या मान्यवरांच्या शुभहस्ते गौरवचिन्ह,सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. आणि सरांची जिल्हास्तरासाठी निवड झाल्याबद्दल सरांचे शालेय सल्लागार समितीचे चेअरमन अरुणबंधू चौधरी,सदस्य दीपक देशमुख,श्रीकांत देशमुख आणि विद्यालयाचे मुख्याध्यापक वसंत महाले,फुलपगारे,शिक्षक प्रतिनिधी मंगल कोळी,सर्व शिक्षक,सर्व पालक,सर्व विद्यार्थी,तळेगाव पंचक्रोशीतील पालकवर्ग यांच्याकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.कल्पेश शिंदे सर यांनी आपल्या पदमश्री संस्थेच्या व तळेगाव शाळेच्या,बिलघर गावच्या इतिहासात मानाचा तुरा रोवल्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातुन कौतुक होत आहे. आणि सरांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या..


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement