कॅप्सूल टँकरमधून गॅसची चोरी करणा-या तिघांना चाकणमध्ये अटक
Raju Tapal
December 16, 2021
41
कॅप्सूल टँकरमधून गॅसची चोरी करणा-या तिघांना चाकणमध्ये अटक
कॅप्सूल टँकरमधून गॅसची चोरी करणा-या तिघांना पिंपरी चिंचवड पोलीसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाकडून चाकणमध्ये अटक करण्यात आली.
नरसिंग दत्तू फड वय - ३१, अमोल गोविंद मुंडे वय - २८ दोघेही रा.बीड, राजू बबन चव्हाण वय - ५२ रा.रासे ता.खेड जि.पुणे अशी याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्याकडून १ कोटी १० लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
कॅप्सूल टँकरमधून एल पी जी गॅस सिलेंडरमध्ये धोकादायकपणे भरून गॅसची चोरी करताना आरोपी आढळून आले.
चाकण पोलीस ठाण्याच्या हद्दीत पिंपरी चिंचवड पोलीसांच्या सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई करून तिघा आरोपींना अटक केली.
वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतही कोकणे चौकात घरगुती वापराच्या सिलिंडरमधून गॅसची चोरी होत असल्याची माहिती मिळाल्याने सामाजिक सुरक्षा विभागाने केलेल्या कारवाईत धनराज मलाप्पा वाघे वय - २८, शुभम रघुनाथ गवळी वय -२७ दोघेही रा.रहाटणी, काकासाहेब साहेबराव मिसाळ वय - ४९ रा. चिंचवड, अतिश अंबादास कसबे वय - २८, सुरेश राजकुमार म्हेत्रे वय - २५ रा. रहाटणी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येवून ३ लाख २२ हजार ५१ रूपयांचा मुद्देमाल आरोपींकडून जप्त करण्यात आला.
Share This