कर्नाटक सरकार या पावसाळी अधिवेशनात ‘रोहित वेमुला बिल’ आणणार..
कर्नाटक सरकार या पावसाळी अधिवेशनात ‘रोहित वेमुला बिल’ आणणार आहे.उच्च शिक्षण संस्थामध्ये जात-धर्म-लिंग यावरून भेदभाव होऊ नये, असा या कायद्याचा उद्देश असेल. रोहित वेमुला हा हैदराबाद विद्यापीठात पीएचडी चा विद्यार्थी होता आणि सामाजिक अन्याया विरुध्द बोलल्याने त्याची फेलोशिप थांबण्यात आली, या परिस्थितीने निराश होऊन त्याने १७ जानेवारी २०१६ रोजी आत्महत्या केली होती.