• Total Visitor ( 551403 )
News photo

आचारसंहितेमुळे केडीएमसीचा लोकशाही दिन पुढे ढकलला

Raju Tapal publisher May 30, 2026 23

आचारसंहितेमुळे केडीएमसीचा लोकशाही दिन पुढे ढकलला



कल्याण:-सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या व तक्रारींचे तातडीने निराकरण करण्यासाठी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी आयोजित करण्यात येणारा लोकशाही दिन पुढे ढकलण्यात आला आहे. महाराष्ट्र विधान परिषदेद्वारे ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक-२०२६ चा कार्यक्रम जाहीर झाल्याने १८ मे २०२६ पासून कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. यामुळे सोमवार,दि. १ जून २०२६ रोजी महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात येणारा लोकशाही दिन रद्द करण्यात आला असून,ठाणे स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणूक-२०२६ ची आचारसंहिता शिथिल होईपर्यंत लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येणार नसल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. तरी नागरिकांनी याची नोंद घ्यावी,असे आवाहन कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement