• Total Visitor ( 506242 )
News photo

तबेल्यातील म्हशींचे शेण थेट ड्रेनेज लाईनमध्ये सोडणाऱ्या तबेलाचालकांना KDMC चा दणका

Raju Tapal publisher May 03, 2026 21

तबेल्यातील म्हशींचे शेण थेट ड्रेनेज लाईनमध्ये सोडणाऱ्या तबेलाचालकांना KDMC चा दणका

KDMC च्या तक्रारीनंतर 21 तबेला मालकांविरोधात बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल



कल्याण :- कल्याण पश्चिम भागात गेल्या अनेक दिवसांपासून गटारे तुंबणे आणि रस्त्यांवर घाण पसरण्याच्या तक्रारी सातत्याने येत होत्या. याची दखल घेत आरोग्य अधिकारी जितेंद्र यादव यांनी पाहणी केली असता धक्कादायक प्रकार उघडकीस आला. गोविंदवाडी आणि रेती बंदर परिसरातील तबेला मालक म्हशींचे शेण व इतर कचरा कोणतीही प्रक्रिया न करता थेट महानगरपालिकेच्या ड्रेनेज लाईनमध्ये सोडत असल्याचे समोर आले. यामुळे सांडपाणी निचऱ्याची संपूर्ण व्यवस्था कोलमडली होती आणि परिसरात तीव्र दुर्गंधी पसरून नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होत होता.याबाबत महापालिकेकडून अनेकदा संबंधित तबेला मालकांना नोटिसा देऊन कचरा व्यवस्थापनासाठी योग्य पर्याय अवलंबण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र,या सूचनांकडे दुर्लक्ष करून घाण टाकण्याचे प्रकार सुरूच ठेवण्यात आले.या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने कठोर कारवाई करत उपायुक्त रामदास कोकरे यांच्या तक्रारीवरून २१ जणांविरुद्ध बाजारपेठ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर सार्वजनिक स्वच्छतेत अडथळा आणणे तसेच पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत कारवाई करण्यात आली आहे.


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement