• Total Visitor ( 430435 )
News photo

सफाई कर्मचा-यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे केसनंद ग्रामपंचायतीकडून कौतुक        

Raju tapal June 13, 2025 59

सफाई कर्मचा-यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल त्यांचे केसनंद ग्रामपंचायतीकडून कौतुक        



शिक्रापूर ( प्रतिनिधी) :- सफाई कर्मचा-यांनी दाखविलेल्या प्रामाणिकपणाबद्दल केसनंद ता‌.हवेली ग्रामपंचायतीकडून त्यांचे कौतुक करून सत्कार करण्यात आला.

पूनावाला क्लिन सिटीचे कर्मचारी हवेली तालुक्यातील केसनंद गावात सफाईचे नियमित काम करत असताना त्यांना केसनंद गावातील शबाना महमंद शेख या महिलेने तिची हि-याची अंगठी गहाळ झाल्याचे सफाई कर्मचा-यांना सांगितले.

कच-यात हरविलेली हि-याची अंगठी शोधण्यासाठी आदर पूनावाला क्लिन सिटीच्या कर्मचा-यांनी कचरा गाडी पूर्ण खाली करून एक -एक कचरा वेगवेगळा करून हरविलेली हि-याची अंगठी शोधून काढली व मूळ मालकाला परत दिली.

सफाई कर्मचा-यांच्या या प्रामाणिकपणाबद्दल केसनंद ग्रामपंचायतीचे सरपंच धनाजी हरगुडे,माजी आदर्श सरपंच प्रमोद हरगुडे पाटील,उपसरपंच भारत हरगुडे,ग्रामपंचायत सदस्य विशाल हरगुडे यांच्या हस्ते सफाई कर्मचा-यांचा प्रामाणिकपणाबद्दल सत्कार करून कौतुक करण्यात आले.

आदर पूनावाला क्लिन सिटीचे मल्हार करवंदे,फारूक बांगी,फ्रॅंक तसेच सुपरवायझर अविनाश चव्हाण यावेळी उपस्थित होते.

माजी सरपंच प्रमोद हरगुडे पाटील यावेळी बोलताना म्हणाले,सफाई कर्मचा-यांनी हि-याची अंगठी शोधून प्रामाणिकपणाचे आदर्श उदाहरण घालून दिले आहे.त्यांचा प्रामाणिकपणा माणुसकीच्या सार्थ अभिमानास पात्र ठरतो.



प्रतिनिधी:- विजय ढमढेरे कोंढापुरी ( शिरूर)

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement