• Total Visitor ( 481988 )
News photo

वेरळ येथे खेड पोलिसांनी गुटख्याची वाहतूक करणारा भरधाव टेम्पो पाठलाग करत पकडला 

Raju tapal June 26, 2025 97

वेरळ येथे खेड पोलिसांनी गुटख्याची वाहतूक करणारा भरधाव टेम्पो पाठलाग करत पकडला 



६० हजारांच्या गुटख्यासह ४ लाखांचा मुद्देमाल जप्त 



खेड पोलीसांची धडाकेबाज कामगिरी;



पोलीसांच्या कामगिरीचे होतेय कौतुक 



खेड :- मुंबई-गोवा महामार्गावरील वेरळ येथे खेड पोलिसांनी कारवाई करत गुटख्याची अवैध वाहतूक करणारा एक टेम्पो ताब्यात घेऊन सुमारे ४ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुरुवारी महामार्गावर पोलिसांकडून वाहतूक तपासणी सुरू असताना एमएच 10 डीटी 6678 क्रमांकाच्या टेम्पोला थांबवण्याचा प्रयत्न केला असता चालकाने टेम्पो भरधाव वेगाने पळवला.



मात्र, खेड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक येवले यांनी प्रसंगावधान राखत पाठलाग करून संबंधित टेम्पो अडवला. तपासणीअंती टेम्पोमध्ये १४ पोत्यांमध्ये भरलेला प्रतिबंधित गुटखा आढळून आला. प्रत्येक पोत्यात २२ पॅकेट असून एकूण ३०८ पॅकेट्स मिळून आले. प्रत्येकी पॅकेटची किंमत १९८ रुपये असून, एकूण गुटख्याची किंमत ६०,९८४ रुपये इतकी आहे. यासोबतच तस्करीसाठी वापरलेला अशोक लेलँड कंपनीचा ४ लाख रुपये किमतीचा टेम्पोही पोलिसांनी जप्त केला आहे. सदर कारवाई पोलीस निरीक्षक नितीन भोयर व उपनिरीक्षक येवले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या प्रकरणी अविनाश पारेकर (वय २१, राहणार अद्याप निष्पन्न नाही) या तरुणाविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, अधिक तपास खेड पोलीस ठाणे करत आहे. कारवाईदरम्यान कॉन्स्टेबल तुषार झेंडे, प्रशांत माळी आणि हवालदार ठाकूर हेही उपस्थित होते.

 


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement