• Total Visitor ( 701120 )
News photo

शिरूर येथे व्याख्यानमालेचे आयोजन 

Raju tapal April 17, 2025 104

शिरूर येथे व्याख्यानमालेचे आयोजन 



शिरूर :- भारतरत्न,महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त शिरूर येथे दोन दिवस व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे.

शिरूर येथील राजभोग‌ बॅंक्वेट हाॅलमध्ये व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले असून मंगळवार दि.२२ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता लोकमत पुणे आवृत्तीचे संपादक संजय आवटे यांचे "शिवराय ते भीमराव" या विषयावर व्याख्यान पार पडणार असून बुधवार दि.२३ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी साडेसहा वाजता डी आय जी ,सी आय डी सारंग आवाड यांचे "कोवळी तरूणाई गुन्हेगारीच्या विळख्यात" या विषयावर व्याख्यान होणार आहे.

व्याख्यानमालेचे हे दुसरे वर्ष असून शिरूर जिल्हा पुणे येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर विचारमंचाच्या वतीने व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आलेले आहे.



प्रतिनिधी:- विजय ढमढेरे ( कोंढापुरी ता‌.शिरूर )


Share This

titwala-news

Advertisement

Advertisement

डाक अदालतीचे आयोजन

Raju Tapal publisher September 02, 2026